Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुस्तके माणसाला ज्ञानी बनवतात ः हेमचंद्र भवर

कोपरगाव तालुका ः ग्रंथ हेच गुरू असून मधमाशीप्रमाणे पुस्तकांमधून अनमोल ज्ञानाचा ठेवा उपलब्ध होतो पुस्तके माणसाला ज्ञानी बनवतात असे विचार छायाचित्र

देवळाली प्रवरा शाळेत आंनद मेळावा उत्साहात
कुस्तीपटू सोनाली मंडलिकला सुवर्णपदक
अहमदनगर जिल्ह्याने राबविलेल्या उपाययोजनांची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून दखल

कोपरगाव तालुका ः ग्रंथ हेच गुरू असून मधमाशीप्रमाणे पुस्तकांमधून अनमोल ज्ञानाचा ठेवा उपलब्ध होतो पुस्तके माणसाला ज्ञानी बनवतात असे विचार छायाचित्रकार साहित्यिक हेमचंद्र भवर यांनी व्यक्त केले. जागतिक पुस्तक दिनानिमित्त वाचन संस्कृती जोपासण्यासाठी चंद्रमा कलर फोटोचे वतीने वाचकांना पुस्तक भेट समारंभ आयोजित करण्यात आला होता.
पुस्तक वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून शब्द गंध साहित्यिक परीषद महाराष्ट्र राज्य कोपरगाव शाखेच्या वतीने व चंद्रमा कलर फोटोचे वतीने उपक्रम राबविले जातात विद्यार्थी, नवोदित लेखकांना प्रोत्साहन देण्यासाठी ग्रंथ भेट देऊन प्रेरणा दिली जाते. यावेळी श्री वसंतदादा मल्टी स्टेट को ऑपरेटिव्ह सोसायटीच्या व्यवस्थापिका अनुराधा रणदिवे यांनी पुस्तक वाचणे आवश्यक आहे, असे विचार व्यक्त केले तर श्री रेणुका माता मल्टीस्टेट को ऑपरेटिव्ह अर्बन सोसायटीचे व्यवस्थापक रविंद्र माळी यांनीही पुस्तक माणसाला ज्ञानी बनवतात असे विचार व्यक्त केले. याप्रसंगी वैष्णवी शहाणे, भारती रक्ताटे, मंगल हेमचंद्र भवर आदी उपस्थित होते.

COMMENTS