प्रसिद्ध अभिनेता मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते झाडीपट्टीच्या गद्दार या नाटकाचे पुस्तक प्रकाशन

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रसिद्ध अभिनेता मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते झाडीपट्टीच्या गद्दार या नाटकाचे पुस्तक प्रकाशन

  चंद्रपूर प्रतिनिधी - विदर्भातील झाडीपट्टी रंगभूमीचे प्रख्यात नाट्यलेखक आनंद भीमटे यांचे 'गद्दार' हे नाटक आता पुस्तक रुपात येत असून आज त्याचे प्रका

खा. शरद पवार व ठाकरेंनी एनडीएमध्ये यावे
वरातीत नाचताना तरुणाचा मृत्यू
कापसाला यावर्षी योग्य भाव नसल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी  – खा. रक्षा खडसे  

  चंद्रपूर प्रतिनिधी – विदर्भातील झाडीपट्टी रंगभूमीचे प्रख्यात नाट्यलेखक आनंद भीमटे यांचे ‘गद्दार’ हे नाटक आता पुस्तक रुपात येत असून आज त्याचे प्रकाशन करण्यात आले. प्रसिद्ध सिने अभिनेता मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते शंकरपूर येथे या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या वेळी पद्मश्री परशुराम खुणे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. विशेष म्हणजे गद्दार या नाटकात मकरंद अनासपुरे यांची प्रमुख भूमिका असून या पुस्तक प्रकाशन सोहळ्या नंतर हे नाटक देखील सादर करण्यात आले. या वेळी मकरंद अनासपुरे यांनी झाडीपट्टी रंगभूमीचे जेष्ठ कलावंत परशुराम खुणे यांना मिळालेल्या पद्मश्री बद्दल आनंद व्यक्त करत या रंगभूमीचा मुख्य प्रवाहात समावेश व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली.

COMMENTS