Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

एसटी कर्मचार्‍यांना 6 हजार रुपयांचा बोनस

मुंबई ः सातवा वेतन आयोग आणि विविध मागण्यांसाठी गुणरत्न सदावर्ते यांनी काही दिवसांपूर्वी आंदोलनाची हाक दिली होती. त्याला एसटी कर्मचार्‍यांनी प्रति

अपात्र ठरविलेल्या शाळा, तुकड्यांना अनुदानास पात्र घोषित करुन वेतन अनुदान वितरित करावे
हेमंत गोडसे पराभवाच्या छायेत
अत्याचाराचे आरोप करणारी महिलेचे दाऊदशी संबंध – खा. शेवाळे

मुंबई ः सातवा वेतन आयोग आणि विविध मागण्यांसाठी गुणरत्न सदावर्ते यांनी काही दिवसांपूर्वी आंदोलनाची हाक दिली होती. त्याला एसटी कर्मचार्‍यांनी प्रतिसाद दिला नव्हता, मात्र आता एसटी कर्मचार्‍यांची दिवाळी गोड होणार आहे. कारण शिंदे सरकारने एसटी कर्मचार्‍यांसाठी सरसकट 6 हजार रुपयांच्या बोनसची घोषणा केली आहे.
 कर्मचारी आणि अधिकारी या सर्वांना 6 हजार रुपयांचा बोनस मिळणार आहे. गेल्या वर्षी कर्मचार्‍यांना 5 हजार रुपयांचा बोनस जाहीर करण्यात आला होता. शिंदे सरकारने मागच्या वर्षीच्या तुलनेत एसटी कर्मचार्‍यांच्या बोनसमध्ये एक हजार रुपयांची वाढ केली आहे. एसटी संघटनांनी यंदा दिवाळीचा बोनस सरसकट 15 हजार रुपये देण्याची मागणी केली होती. मात्र, शिंदे सरकारकडून ही मागणी मान्य झालेली नाही. असे असले तरी बोनसमध्ये वाढ झाल्याने एसटी कर्मचार्‍यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. त्यांची दिवाळी काही प्रमाणात गोड होणार आहे. मंत्री उदय सामंत एसटी कर्मचार्‍यांच्या प्रतिनिधींशी संवाद ठेवून होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले होते, की, उदय सामंत कर्मचार्‍यांशी संपर्कात असून ते यावर तोडगा काढतील.

COMMENTS