Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या

मुंबई ः देशात सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु असून, महाराष्ट्रात 5 टप्प्यात मतदान पार पडत आहे. पहिल्या आणि दुसर्‍या टप्प्यातील मतदानानंतर आता

दखल : अजित पवारांनी केला अहमदनगरचे ऑक्सिजन चोरण्याचा प्रयन्त ? | पहा Lok News24
यंदा चांगल्या पावसाचे वर्तमान
ठाण्यात 9 वर्षांच्या मुलाचे अपहरण

मुंबई ः देशात सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु असून, महाराष्ट्रात 5 टप्प्यात मतदान पार पडत आहे. पहिल्या आणि दुसर्‍या टप्प्यातील मतदानानंतर आता तिसर्‍या, चौथ्या आणि पाचव्या टप्प्यासाठी जोरदार तयारी सुरु करण्यात आली आहे. यापार्श्‍वभूमीवर मुंबई विद्यापीठाने काही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई विद्यापीठाकडून उन्हाळी सत्रामध्ये घेण्यात येणार्‍या काही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. शैक्षणिक वर्ष 2023-24 अंतर्गत होणार्‍या 6, 7 आणि 13 मे रोजी होणार्‍या सर्व परीक्षा पुढे ढकलल्या आल्या आहेत. यासंदर्भातील माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली आहे.

COMMENTS