नवी दिल्ली : दक्षिण दिल्लीतील पुष्प विहार भागातील अमृता शाळेत ई-मेलद्वारे बॉम्बस्फोटाचा इशारा देण्यात आला आहे. शाळा प्रशासनाला सकाळी 7 वाजेच्या स
नवी दिल्ली : दक्षिण दिल्लीतील पुष्प विहार भागातील अमृता शाळेत ई-मेलद्वारे बॉम्बस्फोटाचा इशारा देण्यात आला आहे. शाळा प्रशासनाला सकाळी 7 वाजेच्या सुमारास हा मेल प्राप्त झाला. या माहितीनंतर दिल्ली पोलिसांनी घटनास्थळ गाठून शाळा रिकामी करून घेतली. बॉम्बशोधक पथकालाही पाचारण करण्यात आले आहे. शाळेत शोधमोहीम सुरू आहे. दिल्लीतील शाळांमध्ये बॉम्बची धमकी देणारा हा पाचवा मेल आहे. यापूर्वी इंडियन स्कूलला 2 मेल आले आहेत. मेल पाठवणार्यांबाबत आतापर्यंत कोणतीही माहिती मिळालेली नाही. याशिवाय, मथुरा रोडवरील दिल्ली पब्लिक स्कूल (डीपीएस) या शाळेलाही 2 मेल आले होते. मात्र मेल करणारे दोघेही शाळेचे विद्यार्थीच निघाले होते. आता अमृता स्कूलला मिळालेला हा पाचवा मेल असून याचा तपास सुरू आहे.
COMMENTS