पुणे/प्रतिनिधी ः पुण्यातील कोथरूड येथून काही दिवसांपूर्वी ताब्यात घेतलेल्या दहशतवाद्यांची एटीएसकडून कसून चौकशी करण्यात येत असून, या चौकशीत अनेक ध
पुणे/प्रतिनिधी ः पुण्यातील कोथरूड येथून काही दिवसांपूर्वी ताब्यात घेतलेल्या दहशतवाद्यांची एटीएसकडून कसून चौकशी करण्यात येत असून, या चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे होतांना दिसून येत आहे. यामध्ये दहशतवाद्यांच्या घरात फॅनमध्ये लपवलेला एक कागद सापडला. या कागदात एटीएसला बॉम्ब बनवण्याची माहिती आढळून आली आहे.
या कागदावर बॉम्ब बनवण्याची प्रक्रिया लिहिण्यात आली होती. ही सर्व प्रक्रिया या दोघांनी हाताने लिहिलेली होती. युनस साकी आणि इम्रान खान या दोघांच्या घरात सीलींग फॅनमध्ये हा कागद सापडलाय. अल्युमिनीअम पाईप बल्बच्या फिलॅमेंटस आणि दोन बंदुकीच्या गोळ्या देखील या ठिकाणी सापडल्यात. या दोघांनी सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांच्या जंगलांमध्ये जाऊन बॉम्बस्फोट घडवण्याची चाचणी केली होती. अशी माहिती एटीएसने दिली आहे. 18 जुलै रोजी पुण्यातील कोथरूड भागात दुचाकी चोरत असताना हे दोन वॉन्टेड दहशतवादी सापडले होते. यानंतर पोलिसांनी त्यांची झडती घेतली. तेव्हा पोलिसांनी त्याच्या घरातून काही वस्तू जप्त केल्या होत्या. तसेच दोघांना ताब्यत घेतले आहे. 25 जुलै रोजी जिल्हा व सत्र न्यायालयात या दोघांना हजर करण्यात आले होते. त्यावेळी या दोघांनी पुणे, सातारा, कोल्हापूरच्या जंगलात बॉम्बस्फोटाची चाचणी केल्याची माहिती एटीएसने न्यायालयात दिली होती. त्यानंतर तपासात आता बॉम्ब बनवण्याचा कागद देखील सापडला.
COMMENTS