कोलकाता वृत्तसंस्था - पश्चिम बंगाल पुन्हा एकदा बॉम्बस्फोटाने हादरले असून, पूर्वा मेदिनीपूर जिल्ह्यातील भूपतीनगर भागात तृणमूल काँग्रेस बूथ अध्यक्
कोलकाता वृत्तसंस्था – पश्चिम बंगाल पुन्हा एकदा बॉम्बस्फोटाने हादरले असून, पूर्वा मेदिनीपूर जिल्ह्यातील भूपतीनगर भागात तृणमूल काँग्रेस बूथ अध्यक्ष राजकुमार मन्ना यांच्या घरी स्फोट झाला. शुक्रवारी रात्री झालेल्या या स्फोटात तिघांचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
तृणमूल काँगे्रसचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी शनिवारी भूपतीनगरमध्ये ज्या ठिकाणी लोकांना संबोधित करणार होते, तेथून 1.5 किमी अंतरावर असलेल्या कोंटाई नगरमध्ये हा स्फोट झाला. बॉम्बचा स्फोट एवढा भीषण होता की कौलारू छत असलेले मातीचे घर उद्ध्वस्त झाले. मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही, परंतु असे मानले जात आहे की, जे लोक मरण पावले ते सर्व तृणमूल काँगे्रसचे कार्यकर्ते होते. हा स्फोट नेमका कशामुळे झाला हे अद्याप पोलिसांना समजू शकलेले नाही. घरावर कोणीतरी बॉम्ब टाकला असावा, अशी शक्यताही पोलिस तपासत आहेत. घरातच ठेवलेल्या क्रुड बॉम्बचा स्फोट झाल्याने हा स्फोट झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
याशिवाय या बॉम्बस्फोटात अन्य काहीजण जखमी झाल्याचीही माहिती समोर आली आहे. बॉम्बस्फोट एवढा भीषण होता की त्यामध्ये बूथ अध्यक्षाचे संपूर्ण घर उध्वस्त झाले. ही घटना टीएमसीचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांच्या कोंटाई येथे होणार्या सभेपूर्वी घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळाताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेतले व शवविच्छेदनासाठी पाठवले. जखमींना तत्काळ रुग्णलायत दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.
COMMENTS