Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राहुरीत आढळला वृद्धेचा मृतदेह  

देवळाली प्रवरा : राहुरी बु. येथे मळ्हारवाडी रोडलगत असलेल्या एका शेतात ६४ वर्षीय वृद्ध महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. लताबाई भास्कर उंडे

राहुरीत गुन्हेगारी वाढली, पोलिसांची पकड सैलच !
राहुरीत पतीचा गळा दाबून खून
यात्रेदरम्यान हाणामारी; गाडी जाळली 

देवळाली प्रवरा : राहुरी बु. येथे मळ्हारवाडी रोडलगत असलेल्या एका शेतात ६४ वर्षीय वृद्ध महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. लताबाई भास्कर उंडे असे मृत महिलेचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी (दि.१ फेब्रुवारी) सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास सुनील भास्कर उंडे हे आपल्या शेतात पाहणीसाठी गेले होते. त्यांना त्यांची आई लताबाई उंडे या शेतात मृत अवस्थेत आढळून आल्या. मृतदेह काही दिवसांपासून तेथेच असल्याने तो कुजलेल्या अवस्थेत होता.

घटनेची माहिती मिळताच राहुरी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय नवले करीत आहेत. प्राथमिक जबाबात कुटुंबीयांनी कोणताही संशय अथवा तक्रार नसल्याचे सांगितले आहे.

COMMENTS