Homeताज्या बातम्यादेश

बॉडी बिल्डरचा हृदयविकारामुळे जीममध्येच मृत्यू

चेन्नई ः हृदयविकाराच्या झटक्याचा धोका टाळण्यासाठी नियमित व्यायाम करण्याच्या सल्लाही अनेक तज्ज्ञ देतात. मात्र एका बॉडी बिल्डरचा जीममध्येच मृत्यू झ

  चालत्या एक्सप्रेसवर दगड मारल्याने महिला जखमी 
यंदा शिवराज्याभिषेक सोहळ्याला आचारसंहितेचा अडसर
लातूर ग्रामीणमधील रस्त्यांचे चित्र पालटणार

चेन्नई ः हृदयविकाराच्या झटक्याचा धोका टाळण्यासाठी नियमित व्यायाम करण्याच्या सल्लाही अनेक तज्ज्ञ देतात. मात्र एका बॉडी बिल्डरचा जीममध्येच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. चेन्नईच्या कोराट्टूर येथे ही घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 41 वर्षीय बॉडी बिल्डर योगेशचा जीममध्ये हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. योगेश 2022 पासून जीमपासून दूर होता. मात्र पुढच्या महिन्यात होणार्‍या स्पर्धेसाठी त्याने पुन्हा तयारी सुरू केली होती. ज्यासाठी तो सतत जीममध्ये जाऊन घाम गाळत होता. याआधी योगेशने ’मिस्टर तामिळनाडू’चा किताब पटकावला होता.

COMMENTS