सध्या देओल कुटुंबीय ‘गदर २’ चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे. ‘गदर २’ चित्रपटाने नुकताच बॉक्स ऑफिसवर ५०० कोटींचा टप्पा पार केला आहे. नुकताच शनिवारी

सध्या देओल कुटुंबीय ‘गदर २’ चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे. ‘गदर २’ चित्रपटाने नुकताच बॉक्स ऑफिसवर ५०० कोटींचा टप्पा पार केला आहे. नुकताच शनिवारी या ‘गदर २’च्या कलाकारांनी सक्सेस पार्टीचं आयोजन केलं होतं. यावेळी देओल कुटुंबीयही उपस्थित होतं. सध्या देओल कुटुंबीयांमध्ये चित्रपटाने मिळवलेल्या भरघोस यशानिमित्त आनंदाचं वातावरण असताना, त्यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. बॉबी देओलची पत्नी तान्या देओलच्या आईचे निधन झाले. तिच्या आईचे नाव मर्लिन अहूजा असून त्यांच्या निधनामुळे देओल कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तान्याची आई मर्लिन देओल गेल्या काही दिवसांपासून एका गंभीर आजाराशी झुंज देत होती. आजारपणामुळे निधन झालंय. आपल्या आईच्या निधनाचे वृत्त ऐकून बॉबी देओलची पत्नी तान्या देओल शोकसागरात बुडाली आहे. मर्लिन अहुजा यांच्याबद्दल सांगायचे तर, त्या एक सुप्रसिद्ध बिझनेसवुमन होत्या. मर्लिन यांच्या पश्चात मुलगी तान्या देओलसह दोन मुलंही होते. त्यांचे नाव विक्रम अहुजा आणि मुनिषा अहुजा असे आहे.
COMMENTS