Homeमहाराष्ट्रअहमदनगर

निर्मलाताई काकडे महाविद्यालयात रक्तदान शिबीर उत्साहात

शेवगाव : येथील निर्मलाताई काकडे आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेजमध्ये मंगळवारी (दि.३०) जनकल्याण रक्तपेढी, अहिल्यानगर, राष्ट्रीय सेवा योजना व रेड रिबन क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन प्रमुख अतिथी डॉ. विलास मढीकर व डॉ. सुजाता दहिफळे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. ए. दुकळे हे होते. दीपप्रज्वलन व प्रतिमापूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.  यावेळी बोलताना डॉ. विलास मढीकर यांनी रक्तदानाचे महत्त्व विशद करत प्रत्येक निरोगी व्यक्तीने रक्तदान करावे, असे आवाहन केले. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. पी. ए. दुकळे यांनी विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण करण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले.  या रक्तदान शिबिरात महाविद्यालयातील विद्यार्थी व प्राध्यापकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. आनंद गायके यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. शीतल गुंजाळ यांनी केले, तर आभारप्रदर्शन प्रा. वैशाली म्हस्के यांनी केले. कार्यक्रमास प्राध्यापकवर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जामखेड पोलिसांच्या वतीने रक्तदान शिबीर उत्साहात
श्रीगोंद्यात ईद निमित्त रक्तदान शिबीर उत्साहात
संत निरंकारी मिशनच्या वतीने आज रक्तदान शिबीर

शेवगाव : येथील निर्मलाताई काकडे आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेजमध्ये मंगळवारी (दि.३०) जनकल्याण रक्तपेढी, अहिल्यानगर, राष्ट्रीय सेवा योजना व रेड रिबन क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिराचे उद्घाटन प्रमुख अतिथी डॉ. विलास मढीकर व डॉ. सुजाता दहिफळे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. ए. दुकळे हे होते. दीपप्रज्वलन व प्रतिमापूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. 

यावेळी बोलताना डॉ. विलास मढीकर यांनी रक्तदानाचे महत्त्व विशद करत प्रत्येक निरोगी व्यक्तीने रक्तदान करावे, असे आवाहन केले. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. पी. ए. दुकळे यांनी विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण करण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले.

 या रक्तदान शिबिरात महाविद्यालयातील विद्यार्थी व प्राध्यापकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. आनंद गायके यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. शीतल गुंजाळ यांनी केले, तर आभारप्रदर्शन प्रा. वैशाली म्हस्के यांनी केले. कार्यक्रमास प्राध्यापकवर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS