Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्रीगोंद्यात दूध उत्पादक शेतकर्‍यांचा रास्ता रोको

रस्त्यावर दूध ओतून केला निषेध

श्रीगोंदा ः सहकारी आणि खाजगी दुध प्लॅन्ट चालक शासनाने ठरवुन दिलेल्या हमीभावापेक्षा 10 रुपये प्रति लिटर कमी दराने दूध घेत असल्यामुळे दुध उत्पादक

कोपरगाव शहरातील गुंडांना धडा शिकविणे गरजेचे ः वहाडणे
नगर शहरात शिवसेनेचा आमदार करणारच : भाऊ कोरगावकर
पाचेगाव शिवारात आढळला तरूणाचा मृतदेह

श्रीगोंदा ः सहकारी आणि खाजगी दुध प्लॅन्ट चालक शासनाने ठरवुन दिलेल्या हमीभावापेक्षा 10 रुपये प्रति लिटर कमी दराने दूध घेत असल्यामुळे दुध उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. शेतकर्‍यावर होणार्‍या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी दूध उत्पादक संघर्ष समितीचे अध्यक्ष सोनू कोथिंबीरे आणि संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अरविंद कापसे यांच्या नेतृत्वाखाली शहरातील महात्मा फुले सर्कल येथे तब्बल दीड तास रस्ता रोको करण्यात आला. यावेळी शेतकर्‍यांनी दूध रस्त्यावर ओतून शासनाचा निषेध व्यक्त केला. यावेळी बीआरएसचे घनश्याम शेलार, राजेंद्र म्हस्के, टिळक भोस नगरसेवक प्रशांत गोरे, संतोष कोथिंबीरे, सतीश मखरे, विलास रसाळ यांच्यासह तालुक्यातील शेतकरी उस्फुर्तपणे मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.  
      यावेळी शासनाने दुधाला 34 रु हमीभाव जाहीर करून देखील येथील खाजगी आणि सहकारी प्लॅन्ट चालकांनी संगनमताने दुधाचे भाव पाडून 26 ते 28 रु लिटर प्रमाणे आज दुधाला बाजार मिळत आहे. उत्पादन खर्चापेक्षा देखील मिळणारा दर कमी असल्यामुळे तालुक्यातील दूध उत्पादक प्रचंड अडचणीत आला आहे. एकीकडे पशुखाद्याचे वाढलेले दर, दुष्काळ,चारा टंचाई, भेसळयुक्त दुधामुळे प्रामाणिक कष्ट करणार्‍या शेतकर्‍यांवर होणारा अन्याय या सर्व प्रश्‍नांवर आवाज उठवण्यासाठी आणि सरकारने दूध उत्पादकांची केलेल्या फसवणुकीचा निषेध करण्यासाठी महात्मा फुले सर्कल येथे सकाळी 9 ते 12 असा तब्बल तीन तास रस्ता रोको करण्यात आला. रस्ता रोको आंदोलनाच्या वेळी रस्त्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणात वाहने अडकून पडली होती. पोलीस प्रशासनास सदरील रस्ता वाहतूक सुरळीत करण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. यावेळी संतोष खेतमाळीस, आदेश शेंडगे, कालिदास कोथिंबिरे, सागर बोरुडे, दिलीप लबडे, प्रदीप लोखंडे, बंटी बोरुडे, अ‍ॅड समित बोरुडे, इरफान पिरजादे, प्रशांत गोरे, एम.डी. शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. रस्ता रोकोसाठी पोलीस प्रशासनाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक झंजाड, पोना तरटे, पो. कॉ. गर्जे, गावडे, जाधव यांनी चोख बंदोबस्त केला. यावेळी उपस्थितांचे आभार सागर बोरुडे यांनी मानले.

COMMENTS