Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पाथर्डीत ओबीसी आंदोलकांचा रास्ता रोको

प्रा. लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाची शासनाने दखल घेण्याची मागणी

पाथर्डी ः ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी ओबीसी भटक्या विमुक्त जाती जमातीचे आरक्षण बचावासाठी सुरू केलेल्या आमरण उपोषणाच्या समर्थनार्थ सकल ओबी

पोलिस पथकावर हल्ला करणाऱ्या वाळू तस्करांना विविध कलमान्वये शिक्षा 
नगर शहरात अवैध धंद्यांचा सुळसुळाट…
तक्रारदार शेख यांचा जबाब नोंदवला जाणार

पाथर्डी ः ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी ओबीसी भटक्या विमुक्त जाती जमातीचे आरक्षण बचावासाठी सुरू केलेल्या आमरण उपोषणाच्या समर्थनार्थ सकल ओबीसी समाजाच्या वतीने पाथर्डी शहरातील नाईक चौकात बुधवारी सकाळी रास्ता रोको करत प्रांत अधिकारी प्रसाद मते यांना निवेदन देण्यात आले. यावेळी ओबीसी नेते दिलीप खेडकर, दिनकरराव पालवे, माणिक खेडकर, किसन आव्हाड, गोरक्ष ढाकणे, गणेश चितळकर, प्रा. सुनिल पाखरे यांच्यासह ओबीसी बांधव उपस्थित होते.
गेल्या सहा दिवसांपासून प्रा. लक्ष्मण हाके यांनी जालना येथील वडीगोद्री येथे आमरण उपोषण सुरु केले असून अद्याप शासनाने या उपोषणाची कोणतीही दखल घेतली नसल्या कारणाने सकल ओबीसी बांधवाच्या वतीने आज सकाळी नाईक चौक पाथर्डी येथे रस्ता रोको आंदोलन केले.यावेळी प्रांताधिकारी प्रसाद मते आणि तहसीलदार नाईक यांच्या रास्ता रोको कर्त्याच्या भावना समजून घेतल्या.

COMMENTS