Homeताज्या बातम्याशहरं

युगांडात अंध मुलांच्या शाळेला भीषण आग; 11 विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू

कंपाला : अफ्रिकेतील युगांडातील अंध मुलांच्या एका शाळेला भीषण आग लागली असून यामध्ये 11 विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तसेच इतर सहा जणांच

महाबळेश्‍वर तालुक्यात मुसळधार पाऊस; स्ट्रॉबेरीच्या शेतात पाणी साचले
उंबर्डे फाट्यावरील ’त्या’अपघातातील जखमीचा मृत्यू
पर्यावरण संवर्धन जनजागृती सायकल महारॅलीला उत्स्फुर्त प्रतिसाद : मनोहर शिंदे

कंपाला : अफ्रिकेतील युगांडातील अंध मुलांच्या एका शाळेला भीषण आग लागली असून यामध्ये 11 विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तसेच इतर सहा जणांची प्रकृती गंभीर आहे, अशी माहिती रॉयटर्सने दिली आहे. मंगळवारी मध्यरात्री ही घटना घडल्याचं स्थानिक पोलिसांनी सांगितले.
मुकोनो इथल्या एका अंध मुलांच्या शाळेत मंगळवारी मध्यरात्री 1 वाजता ही आग लावली. दुर्घटनेचे हे ठिकाण कंपाला या राजधानीच्या शहरापासून पूर्वेला 30 किमी आहे. या भीषण आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली.
युगांडामध्ये शाळांना आगी लागणे ही सामान्य बाब झाली असून वसतिगृहांमध्ये बर्‍याचदा अशा आगी लागतात. बहुतेक आगी या दोषपूर्ण इलेक्ट्रिसिटी वायरिंगमुळे झाल्याचे अधिकारी सांगतात. पण हे प्रकार या देशात जाणून बुजून केल्याचे काहीजण सांगत आहेत.

COMMENTS