Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भाजपने विरोधी मतांचे विभाजन करून हा विजय मिळविला : ना. जयंत पाटील

नेर्ले : नळ पाणी पुरवठा योजनेच्या उद्घाटनप्रसंगी ना. हसन मुश्रीफ, ना. जयंत पाटील, सौ. रुपाली चाकणकर, आ. मानसिंग नाईक, जितेंद्र डुडी, देवराज पाटील, सु

सातारा ‘सिव्हिल’ला ट्रॉमा केअर युनिट मंजूर; महाविकास आघाडीची सत्ता जाता-जाता सातारकरांसाठी सुविधा
महाराष्ट्र धर्म जपण्यासाठी महाविकास आघाडीस ताकद द्या : आ. जयंत पाटील
युनायटेड वेस्टर्न बँकेचे माजी चेअरमन पी. एन. जोशी यांचे निधन

इस्लामपूर / प्रतिनिधी : पाच राज्यातील निवडणुकांच्या निकाला वरून सगळे संपले असे वातावरण निर्माण केले जात आहे. मात्र, भाजपने विरोधी मतांचे विभाजन करून हा विजय मिळविला आहे. उत्तर प्रदेशमधील निवडणुकीत बसपा आणि एमआयएमच्या उमेदवारांनी काही मते खाल्ल्याने समाजवादी पक्षाच्या अनेक जागा दोनशे ते दोन हजारच्या फरकाने पडल्या, असे भाष्य राज्याचे जलसंपदामंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी नेर्ले येथील समारंभात बोलताना केले.
नेर्ले येथे 5 कोटी 76 लाख रुपयांच्या नळ पाणी पुरवठा योजनेच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. प्रारंभी राज्याचे ग्रामविकास मंत्री ना. हसन मुश्रीफ यांच्या हस्ते योजनेचे उद्घाटन करण्यात आले. महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ. रुपाली चाकणकर, आ. मानसिंगराव नाईक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराज पाटील, जिल्हा परिषद सदस्या संगिता पाटील, सभापती सौ. शुभांगी पाटील, महिला राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षा सौ. सुस्मिता जाधव, संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष संजय पाटील, कृष्णेचे संचालक संभाजी पाटील प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी डॉ. एस. व्ही. पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
ना. पाटील म्हणाले, पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढ, महागाईने सामान्य जनता हैराण आहे. शेतकरी आंदोलन, लखीमपूर शेतकरी हत्या आदी अनेक प्रश्‍न आहेत. अखिलेश यादव, प्रियांका गांधी यांच्या सभांना मिळणारा प्रतिसाद पाहता हा निकाल अनपेक्षित आहे. आम्ही जनतेला लोकोपयोगी कामे, तसेच
पारदर्शी आणि भ्रष्टाचारमुक्त प्रशासन देण्याचा प्रयत्न करीत आहे. आपण सध्या शाळेतच जातीचे दाखले देत आहोत. आतापर्यंत 8 हजार दाखले दिले आहेत. आता शाळेतच जात पडताळणी दाखले देण्याची व्यवस्था केली आहे. माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांच्या पक्ष प्रवेशाने जिल्ह्यात आमच्या पक्षास बळकटी मिळेल.
ना. मुश्रीफ म्हणाले, राज्य शासनाने नियमित कर्जदारांना 50 लाख अनुदान जाहीर केले आहे. पश्‍चिम महाराष्ट्रात नियमित कर्जदारांची संख्या जास्त असल्याने आपणास त्याचा चांगला फायदा होवू शकतो. राज्यातील 11 कोटी जनतेपैकी साडेचार कोटी लोक हे कामगार आहेत. यातील 80 लाख संघटीत आहेत. उर्वरित 4 कोटी कामगारांच्या जीवनात परिवर्तन, क्रांती घडवून आणणार आहोत.
याप्रसंगी सौ. रुपाली चाकणकर, आ.मानसिंगराव नाईक यांनी मनोगत व्यक्त केले. संजय पाटील, संभाजी पाटील यांनी स्व. बापूंनी 50 वर्षांपूर्वी गावाला नळ पाणी पुरवठा योजना दिली होती. मध्यंतरी पिण्याच्या पाण्याची अवस्था बिकट होती. साहेबांनी पुन्हा आमच्यासह 11 गावांना अद्यावत पिण्याच्या पाण्याची योजना दिली असल्याची माहिती दिली.
प्रारंभी सरपंच छायाताई रोकडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. राजारामबापू दूध संघाचे अध्यक्ष नेताजीराव पाटील, प्रांताधिकारी डॉ. संपत खिलारी, तहसिलदार प्रदीप उबाळे, युवक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संग्राम जाधव, कार्याध्यक्ष देवराज देशमुख, महाराष्ट्र केसरी आप्पासाहेब कदम, ज्येष्ठ नेते आप्पा माने, सुभाषराव पाटील, सर्जेराव पाटील, दिलीपराव पाटील, विलासराव पाटील, डी. आर. पाटील, दिनकर मोकाशी, अनिल साळुंखे, शुभम पाटील यांच्या गावातील पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, नळपाणी पुरवठा खात्याचे अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. उपसरपंच विश्‍वास पाटील यांनी आभार मानले. गोपाळ पाटसुपे यांनी सूत्रसंचालन केले.

COMMENTS