Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भाजपकडून आरक्षण कमकुवत करण्याचा प्रयत्न : खा. प्रियंका गांधी

नवी दिल्ली :भारतीय संविधान आमचे सुरक्षा कवच आहे. संविधानाने जनतेला त्यांच्या हक्कांची, सुरक्षेची हमी दिली आहे. त्यामुळे जनतेला न्याय, एकता, आर्थि

आंबेवाडी शिवारात दरोड्याच्या तयारीत असलेल्या चोरांच्या आवळल्या मुसक्या
अर्थसंकल्पातील विकासाची पंचसूत्री राज्याला प्रगतीपथावर नेईल : ना. मंत्री जयंत पाटील यांचा विश्‍वास
भिंगार कॅम्प पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

नवी दिल्ली :भारतीय संविधान आमचे सुरक्षा कवच आहे. संविधानाने जनतेला त्यांच्या हक्कांची, सुरक्षेची हमी दिली आहे. त्यामुळे जनतेला न्याय, एकता, आर्थिक संरक्षण मिळाले आहे. परंतु, सत्ताधार्‍यांनी हे सुरक्षा कवच तोडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे, खासगीकरण करून आरक्षण कमकुवत करण्याचे काम सुरू आहे, असा घणाघाती आरोप काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांनी शुक्रवारी केला.

गांधी पुढे म्हणाल्या की, भारताला चर्चा आणि संवादाची परंपरा आहे. परंतु, सत्ताधारी जनतेच्या प्रश्‍नावर चर्चा करण्यास तयार नाही. लोकसभा निवडणुकीत असा निकाल लागला नसता, तर सत्ताधार्‍यांनी संविधान बदलेले असते, असाही आरोप त्यांनी यावेळी केला. संविधानामुळे महिलांना लढण्याची हिंमत मिळते. त्यामुळे संविधान बदल्याची भाषा जनता सहन करणार नाही, असा इशारा गांधी यांनी दिला. खाजगीकरणाच्या माध्यमातून हे सरकार आरक्षण कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहे. लोकसभा निवडणुकीचे असे निकाल लागले नसते, तर त्यांनी संविधान बदलण्याचे कामही सुरू केले असते. ते वारंवार संविधानाबद्दल बोलत असल्याचा आरोप गांधी यावेळी केली.

COMMENTS