Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांची गुरू शुक्राचार्य महाराज मंदिरास भेट

कोपरगांव / ता,प्रतिनिधी ः श्रावण महिन्यातील पवित्र सोमवारी सकाळी 11 वाजता   कोपरगांव बेट येथे गुरू शुक्राचार्य महाराज मंदिरात लोकनेता व भारतीय जन

पंकजा मुंडेंबाबत आक्षेपार्ह पोस्ट
“एक-एक आमदार की किमत तुम क्या जानो…” पंकजा मुंडेंची डायलॉगबाजी!
मा. मंत्री पंकजाताई मुंडे यांची श्री. हरिश्चंद्र महादेव यात्रा उत्सवास भेट

कोपरगांव / ता,प्रतिनिधी ः श्रावण महिन्यातील पवित्र सोमवारी सकाळी 11 वाजता   कोपरगांव बेट येथे गुरू शुक्राचार्य महाराज मंदिरात लोकनेता व भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा गोपीनाथराव मुंडे यांनी भेट देत दर्शन घेतले. त्यांच्या समवेत मा.आ.स्नेहलता बिपिन कोल्हे होत्या. पंकजा मुंडे यांचे हस्ते गुरू शुक्राचार्य महाराज मंदिरात मध्यान आरती करण्यात आली.
पंकजा  मुंडे यांनी त्यांच्या शिवशक्ती परिक्रमा या अंतर्गत गुरू शुक्राचार्य महाराज यांचा आशीर्वाद घेण्यासाठी मंदिरात पवित्र तिसर्‍या श्रावणी सोमवारी मंदिरात दर्शनासाठी येत गुरू शुक्राचार्य महाराजांचा आशीर्वाद घेतला.आरती झाल्यानंतर पंकजा मुंडे यांचे हस्ते गुरू शुक्राचार्य महाराज्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड यांचे हस्ते पंकजा मुंडे व स्नेहलता  कोल्हे यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. त्यावेळी पंकजा मुंडे यांनी आवर्जून मंदिराची माहिती घेतली. मंदिराचा इतिहास जाणून घेण्यासाठी त्यांना शुक्र तीर्थ  हे पुस्तक व महाराजांचा प्रसाद देण्यात आला. सदर कार्यक्रमासाठी पंचक्रोशितील भाविक व पंकजा मुंडे यांचे हजारो समर्थक  उपस्थीत होते. याप्रसंगी मंदिर ट्रस्ट अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड, मंदीर प्रमुख सचिन परदेशी,उपमंदिर प्रमुख प्रसाद पर्‍हे,ट्रस्टी हेमंत पटवर्धन व कमिटी मेंबर मधुकर साखरे, दिलीप सांगळे, विजय रोहोम, संजय वाडांगले, विलास.द आव्हाड,विलास .र.आव्हाड, बाळासाहेब लकारे, विकास शर्मा , राजेंद्र आव्हाड, भागचंद रुईकर, सुभाष ढाकणे, विशाल राऊत, महेंद्र नाईकवाडे, डॉ.गर्जे अजय, व बेट ग्रामस्थ, मंदिर पुजारी इत्यादी अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

COMMENTS