Homeताज्या बातम्यादेश

भाजपला आता संघाची गरज नाही

भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचा दावा

नवी दिल्ली ः एकेकाळी भाजपला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची गरज भासायची, मात्र आताचा भाजप हा सक्षम असून, त्यांना आता संघाची गरज नसल्याचे वक्तव्य भाजपच

राज्यात सोमवारपासून वाजणार शाळांची घंटा
माहूरच्या रेणुकादेवी मंदिरातील तांबुलला ‘जीआय टॅग’, 3 ते 4 महिन्यांत प्रमाणपत्र मिळणार
महिला सहकाऱ्याला केसांना पकडून ओढत नेलं, रस्त्यावरच बेदम मारहाण

नवी दिल्ली ः एकेकाळी भाजपला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची गरज भासायची, मात्र आताचा भाजप हा सक्षम असून, त्यांना आता संघाची गरज नसल्याचे वक्तव्य भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी केले आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा दावा केला आहे. त्यामुळे त्यांच्या या दाव्यावर नवे वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे.
या मुलाखतीमध्ये बोलतांना नड्डा म्हणाले की, अटलबिहारी वाजपेयींच्या काळात भाजपला स्वतःला चालवण्यासाठी संघाची गरज होती. कारण त्यावेळी भाजप कमी सक्षम आणि लहान पक्ष होता. मात्र आज आमचा पक्ष मोठा झाला आहे. तसेच पूर्वीपेक्षा अधिक सक्षम झाला आहे. भाजप संपूर्ण पक्ष स्वबळावर चालवतो, असे वक्तव्य नड्डा यांनी केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही सांस्कृतिक आणि सामाजिक संस्था आहे,  तर भाजप हा राजकीय पक्ष आहे, असेही नड्डा म्हणाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर त्यांनी केलेल्या या व्यक्तव्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटणार असल्याची चिन्हे आहेत. जे. पी. नड्डा यांना वाजपेयींच्या काळातील भाजप आणि सध्याच्या भाजप यातील फरक काय असा प्रश्‍न विचारण्यात आला होता. तेव्हा त्यांनी हे उत्तर दिले. पूर्वीपेक्षा आम्ही आता अधिक सक्षम झालो आहोत. भाजप आता संपूर्ण पक्ष स्वतः चालवतो. हाच फरक आहे. पक्षाचे नेते त्यांची कर्तव्ये आणि भूमिका चांगल्या पद्धतीने पार पाडत आहेत. जे.पी नड्डा पुढे म्हणाले की, मथुरा आणि वाराणसीच्या वादग्रस्त जागेवर मंदिरे बांधण्याची भाजपची कोणतीही योजना नाही. भाजपकडे अशी कुठलीही कल्पना, योजना किंवा पक्षाची इच्छा नाही. त्यावरही चर्चा झालेली नाही.राष्ट्रीय स्वयंम सेवक संघाची स्थापना ही 27 सप्टेंबर 1925 रोजी झाली होती. संघ हा भाजपचा वैचारिक गुरु राहिला आहेत. यामुळे भाजपच्या स्थापणे पासून ते सक्षम पक्ष होऊ पर्यंत संघाच्या अनेक दिग्गजांची मोठी मदत झाल्याचे मानले जाते. भाजपचे अनेक ज्येष्ठ नेते संघाचे कार्यकर्ते आणि सदस्य आहेत. मोहन भागवत संघाचे सरसंघचालक आहेत. त्यामुळे जे.पी. नड्डा यांच्या वक्तव्याचे पडसाद राज्याच्या राजकारणात उमटण्याची शक्यता आहे.

संघालादेखील भाजपकडून धोका ः उद्धव ठाकरे – महाविकास आघाडीकडून शनिवारी घेतलेल्या पऋकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली. यावेळी बोलतांना उद्धव ठाकरे म्हणाले की,  देशात सरकारी यंत्रणांचा गैरवापर सुरु आहे. महाराष्ट्र, मुंबईला बदनाम करण्याचे कारस्थान होत आहे. मुंबई लुटून गुजरातला नेण्याचा डाव आहे. महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर महाराष्ट्राचे वैभव आम्ही परत आणू, असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.  बेकायदा सरकार आणि अंसवैधानिक मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान स्वतःच्या हुकूमशाहीचा प्रचार करत आहेत. जो देईल साथ, त्याचा करू घात हीच भाजपची नीती आहे. देशातील सर्व पक्ष संपवून भाजपच हा एकच पक्ष असेल, असे जे.पी. नड्डा म्हणाले होते. आता त्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचीही गरज राहिली नाही. ज्या संस्थेने त्यांना जन्म दिला. त्याच संस्थेची आता त्यांना गरज राहिलेली नाही. आता भाजप राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही नकली स्वयंसेवक संघ म्हणतील. तसेच ते आता संघावरही बंदी घालतील. त्यामुळे आता संघालाही भाजपकडून धोका असल्याचे टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

COMMENTS