Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भाजपने नाविन्यपूर्ण योजनांतून केला देशाचा विकास ः आमदार मोनिका राजळे

पाथर्डी : शेतकर्‍यांसाठी शेततळे, विहीर, पीएम किसान आर्थिक मदत, महिला सशक्तीकरण योजना, बचत गटाला शून्य टक्के व्याजदराने कर्ज,पंतप्रधान आवास योजना

पत्रकारांनी चांगल्या वाईट गोष्टी मांडण्याचे धाडस करावे -आमदार मोनिका राजळे
व्यावसायिक शिक्षण काळाची गरज ः आमदार मोनिका राजळे
संचालकांनी पारदर्शक कारभार केल्याने आर्थिक सुबत्ता : आमदार मोनिका राजळे

पाथर्डी : शेतकर्‍यांसाठी शेततळे, विहीर, पीएम किसान आर्थिक मदत, महिला सशक्तीकरण योजना, बचत गटाला शून्य टक्के व्याजदराने कर्ज,पंतप्रधान आवास योजना त्याचप्रमाणे बारा बलुतेदाराना विश्‍वकर्मा योजनेतून आर्थिक कर्ज स्वरूपात मदत अशी नाविन्यपूर्ण योजना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्यासाठी आणलेल्या असून या सर्व गोष्टीचा विचार करून येणार्‍या लोकसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला चांगले सहकार्य करत पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांना देशाचे पंतप्रधान करावे असे प्रतिपादन आमदार मोनिका राजळे यांनी केले.
पाथर्डी ते कासार पिंपळगाव, कासार पिंपळगाव ते जवखेडे, चितळी ते बर्‍हाणपुर रस्ता व चितळी गावातील विविध अशा एकुण सुमारे दहा कोटींच्या विकास कामांच्या शुभारंभ प्रसंगी राजळे बोलत होत्या. याप्रसंगी भाजप तालुकाध्यक्ष डॉ मृत्यूंजय गर्जे, माजी जि.प.सदस्य राहूल राजळे, शेवगाव पाथर्डी मतदार संघ प्रमुख नारायण पालवे, चारुदत्त वाघ, विष्णुपंत अकोलकर, पोपट कराळे, वसंत भगत, संभाजी गोविंद राजळे, राधाकिसन राजळे, उध्दव महाराज ढमाळ, कृष्ण महाराज ताठे, उध्दव महाराज जाधव, अशोक आमटे, अशोक ताठे, महादेव जायभाये, बाबा आमटे, विनायक ताठे, अनिल ढमाळ, विष्णुपंत ताठे, अजिनाथ आमटे यांची प्रमुख उपस्थिती होती. चितळे गावासाठी भरीव निधी दिल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने आमदार मोनिका राजळे यांची पेढे तुला करण्यात आली. पुढे बोलताना राजळे यांनी म्हटले की, तुम्ही पक्ष संघटनेचे काम किती करतात त्या आधारावर भारतीय जनता पार्टी तुम्हाला निधी आणि निवडणुकीत संधी दिली जाते.त्यामुळे संघटना बांधणीच्या कामात आपण वेळ देऊन प्रभावीपणे काम करावे. केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना राबत विकास कामे केली असून भरीव निधी रस्त्यासह अन्य कामांसाठी दिला गेला आहे. त्यामुळे आता आगामी लोकसभा आणि विधानसभेसाठी आपण आम्हाला साथ देऊन या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला सहकार्य करण्याचे आवाहन आमदार मोनिका राजळे यांनी शेवटी केले.

COMMENTS