दंगलखोरांना भाजप हिंदू म्हणते!

Homeताज्या बातम्यासंपादकीय

दंगलखोरांना भाजप हिंदू म्हणते!

महाविकास आघाडी सरकारचे किंग मेकर गणले जाणारे खासदार संजय राऊत यांनी अमरावतीत दंगल घडविणाऱ्यांवर गुन्हे नोंदवून कारवाई केली जाईल, असे ठामपणे सांगितले.

स्नेहआशा बालगृहांमधील बालकांच्या मुत्यूची चौकशी
‘हाऊसफुल 5’ ची घोषणा ; दिवाळीत होणार प्रदर्शित
डोळ्यांचा फ्लू वेगाने पसरण्याची कारणे, लक्षणे आणि त्यावरील उपाय

महाविकास आघाडी सरकारचे किंग मेकर गणले जाणारे खासदार संजय राऊत यांनी अमरावतीत दंगल घडविणाऱ्यांवर गुन्हे नोंदवून कारवाई केली जाईल, असे ठामपणे सांगितले. पोलिस तपासात जे दंगलखोर समोर येत आहेत, त्यांच्यावर गुन्हे नोंदवले जात असताना भाजप सारखा पक्ष हिंदूंवर गुन्हे दाखल होत असल्याचा कांगावा करित असल्याचा आरोप करून संजय राऊत यांनी केला आहे. त्याचवेळी रझा अकादमीवर बंदी आणण्याचा विचारही केला जात असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. त्रिपुरा घटनाक्रमाची प्रतिक्रिया म्हणून अमरावती व इतर शहरात प्रतिक्रिया उमटल्याचे भासवणारा भाजप प्रत्यक्षात सत्ता प्राप्तीसाठी कोणत्याही स्तराला जाऊन राजकारण करण्याचा स्तर गाठतो. अमरावतीत दंगल घडविणारे प्रत्यक्षात कोणत्या राजकीय पक्षाच्या जवळकीची होते आणि आहेत, हे पोलिस तपासात मिळालेल्या दिशेने स्पष्ट होत आहे. परंतु, सरकार पक्ष आक्रमकपणे दंगलखोरांविरूध्द कारवाई करण्यासाठी सज्ज असताना आणि जे दंगलीत प्रत्यक्ष सहभागी असणारे वा दंगलीच्या आखीव योजनेनुसार दंगल माजविणारे जेरबंद होत असतांना अशा दंगेखोरांना हिंदू म्हणण्याचा पुळका जो भाजपला येतोय, त्याची कारणमीमांसा करायला हवी. महाविकास आघाडीत सत्तेचा प्रमुख घटकपक्ष असणारी शिवसेना हिंदूत्ववादी असूल्याने ते दंगल घडवणाऱ्या हिंदू-मुसलमान अशा कोणाचाही मुलाहिजा करणार नाही. परंतु, सत्ता हातातून निसटलेली भाजपा वर्तमान सत्तेला बदनाम करण्यासाठी अनेक षडयंत्र रचत असल्याचा आरोप यापूर्वी महाविकास आघाडी सरकारमधील व्यक्ती आणि घटकपक्षांनी  केले आहे. सर्वसाधारणपणे महाराष्ट्रासह सर्वच राज्यांतील मुस्लिम समुदाय सध्याच्या काळात आक्रमक नाही. परंतु , त्रिपुरा घटनेचे पडसाद जर उस्फूर्त होते, असं म्हटलं तर ते संपूर्ण महाराष्ट्रात उद्रेकी बनले असते. मुस्लिम आणि हिंदू अशा दोन्ही समुदायातील लोक संयमीच राहिले राज्यात. परंतु, काही ठराविक शहरात दंगलसदृश प्रकार का किंवा कसा झाला याचा निक्षून तपास महाविकास आघाडीने करायला हवा. कारण, अशाप्रकारचे षडयंत्र करूनही ते निभावले गेले तर राज्यात तशा प्रकारच्या शक्ती सशक्त होतील, परिणामी राज्याला अशांततेने घेरण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. सेना नेते खासदार संजय राऊत यांनी ज्या पद्धतीने रोखठोक वक्तव्य केले आहे, त्यामागे वास्तवता असल्याची वस्तुस्थिती त्यांनी लक्षात घेतली आहे. राज्यकर्ते किंवा सत्ताधारी लोकांकडे ज्याचा अभाव असतो तो करारी आणि निश्चयपणा राऊत यांच्या व्यक्तिमत्वात ठाम असल्याने त्यांची वक्तव्य आक्रमक वाटतात. माजी मुख्यमंत्री तथा राज्याचे विरोधीपक्षनेते हे विरोधी पक्षाची आक्रमक भूमिका निभावताना दिसत असले तरी त्या भुमिकेत तितकीच ठाम नैतिकता वाटायला हवी. रझा अकादमीवर बंदी लादण्याची भूमिका जाहीर करणारे राऊत दंगलीतील इतर आरोपी हे धर्मविशेषाचे नसून दंगलखोर आहेत, अशी भूमिका घेऊन त्याविरोधात कडक कारवाई चा निर्धार करतात तेव्हा तो सराहनीय ठरतो, असे म्हटलेच पाहिजे. एकंदरीत, आज सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांच्यात राजकारण होणे हे समजू शकतो, परंतु, जनतेला अशांततेतून वेठीस धरण्याचा प्रकार जर होत असेल तर त्याविषयी सत्ताधाऱ्यांनी मुलाहिजा ठेवू नये. कारण यातून हातावर पोट असणाऱ्या जनतेवर उपासमारीची पाळी येते आणि अनावश्यक असलेले उपद्रवखोर समाजात हावी होण्याचा धोका असतो, त्यामुळे अशा प्रवृत्तींना वेळीच ठिकाणांवर आणायला हवे. त्यादृष्टीने खासदार संजय राऊत यांचे वक्तव्य आशादायी आहे!

COMMENTS