नाशिक प्रतिनिधी - छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्यासह अन्य महापुरुषांच्या विरोधात सातत्याने सत्ताधारी आणि विरोधकांकडून अवमान करणे सुरूच
नाशिक प्रतिनिधी – छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्यासह अन्य महापुरुषांच्या विरोधात सातत्याने सत्ताधारी आणि विरोधकांकडून अवमान करणे सुरूच आहे. राज्यपालांनंतर आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी राजे हे धर्मवीर नव्हते असं वक्तव्य केले आहे. या वक्तव्याचा आता राजकीय पक्षातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. राज्यातील सत्ताधारी शिंदे भाजप गट आक्रमक झाला असून भाजपकडून निषेध आंदोलन करण्यात आले आहे. अजित पवार यांच्या पुतळ्याचे दहन करून अजित पवारांचा निषेध करण्यात आला आहे. यावेळी अजित पवार यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली असून अजित पवार यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.
COMMENTS