Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वाढदिवस सामाजिक दातृत्वाचा!केजमध्ये आ. नमिता मुंदडा यांच्या वाढदिवसानिमित्त मूकबधिर विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावर उमलले हास्य

केज । प्रतिनिधीकेज मतदारसंघाच्या कर्तव्यदक्ष आमदार नमिता अक्षय मुंदडा यांच्या वाढदिवसानिमित्त मूकबधिर निवासी विद्यालय, उमरी येथे सामाजिक बांधिलकी

ओमायक्रॉनने अकोलेकरांचे वाढवले टेन्शन…
विकसित भारताच्या दिशेने पाऊल..
लालपरी जागी खासगी गाड्या फलाटावर; सांगली जिल्ह्यातील प्रकाराने महामंडळाचे वाभाडे
Displaying 3.jpg

केज । प्रतिनिधी
केज मतदारसंघाच्या कर्तव्यदक्ष आमदार नमिता अक्षय मुंदडा यांच्या वाढदिवसानिमित्त मूकबधिर निवासी विद्यालय, उमरी येथे सामाजिक बांधिलकी जपत अर्थपूर्ण उपक्रम राबविण्यात आला. भारतीय जनता पार्टी व युवा नेते सोनू भैय्या सावंत यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले.
आ. मुंदडा यांच्या वाढदिवसानिमित्त हार-तुरे व औपचारिक सत्कार टाळून समाजोपयोगी कार्य करण्याच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी विद्यार्थ्यांना वह्या, पेन तसेच आवश्यक शैक्षणिक साहित्य देण्यात आले. साहित्य मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावर उमटलेला आनंद उपस्थितांना भावूक करून गेला. या उपक्रमावेळी केज तालुका अध्यक्ष भगवान केदार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती डॉ. वासुदेव नेहरकर, युवा नेते सोनू भैय्या सावंत, पत्रकार प्रकाश मुंडे तसेच विक्रम डोईफोडे, विकास जाधव, अशोक मुळे, नाना मुळे, कृष्णा मुळे, बालासाहेब मुळे व गणेश मुळे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमादरम्यान बोलताना डॉ. वासुदेव नेहरकर यांनी आमदार नमिता मुंदडा यांच्या विकासाभिमुख व समाजाभिमुख कार्याचा गौरव करत, मतदारसंघाच्या प्रगतीसोबत सामाजिक बांधिलकी जपण्यामध्ये त्या नेहमीच पुढाकार घेत असल्याचे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे आभार जाधव मॅडम व सूर्यवंशी मॅडम यांनी मानले. यावेळी मूकबधिर निवासी विद्यालय, उमरी येथील शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्थानिक कार्यकर्त्यांच्या सहकार्यामुळे हा सामाजिक उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला.

COMMENTS