Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिर्डीत बिऱ्हाड मोर्चा ; चुल पेटवुन स्वयंपाक बनवत आंदोलन

शिर्डी : शिर्डीतील 500 हुन अधिक दलित बांधवांची घरे बुल्डोजरच्या सहाय्याने पाडण्याचा प्रकार अत्यांत संतापजनक आहे. 60-70 वर्षापासुन हे बांधव नियमित

उपग्रह व ड्रोनच्या माध्यमातून राज्यात ई-पीक पाहणी करण्याचे विचाराधीन: मुख्यमंत्री फडणवीस
महिला अत्याचार रोखण्यासाठी कटिबद्ध
कोल्हापूर, सांगलीला पुन्हा महापुराची धास्ती
WhatsApp Image 2025-04-02 at 7.31.27 PM (1).jpeg

शिर्डी : शिर्डीतील 500 हुन अधिक दलित बांधवांची घरे बुल्डोजरच्या सहाय्याने पाडण्याचा प्रकार अत्यांत संतापजनक आहे. 60-70 वर्षापासुन हे बांधव नियमित पणे लाईटबील घरपट्टी पाणी पट्टी भरत होती. तरी त्यांची घरे उद्ध्वस्त करण्यात आली ही बाब अमानवी व असंवेदनशील असुन कोणाचेही मन हेलावेल अशी घटना आहे. आज या सर्व पिडीत कुटुंबियांनी मोर्चा काढुन प्रांताधिकारी कार्यालयासमोर मोठ्या संख्येने बि-हाड मोर्चा आणला व त्याठिकाणी चुल पेटवुन स्वयंपाक बनविण्याचे आंदोलन सुरु केले आहे. या कुटुंबियांचे दुख शब्दात मांडणे कठीण आहे. कोणतेही ठोस कारण नसताना गरीब व निराधार कुटुंबांना बेघर करण्यात आले त्यामुळे अनेक कुटुंब रस्त्यावर आले असुन त्यांचा जगण्याचा आधार हिरावला गेला आहे. त्या बेघरांमध्ये आजारी व्यक्ती आणी लहान मुलेही होती. एक दिवसाची प्रसुती झालेल्या महिलेलाही बेघर करण्यात आले. ही करवाई सामाजिक अन्यायाचे प्रतिक ठरले आहे. याबाबत आपण मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेवुन या कुटुंबांना तात्काळ सरकारी जागेत घरे बांधुन देण्यासाठी आग्रह धरणार आहे. या आगोदरही आपण महसुल मंत्री बावनकुळे साहेब यांची भेट घेतली त्यांनीही पुनर्वसन करुन घरे बांधुन देण्याचे आश्वासन दिले आहे. यावेळी आरपीआयचे दिलीपराव वाघमारे,माजी नगरसेवक सुरेश आरणे,वंचित बहुनजनचे प्रदेशाध्यक्ष अनिल जाधव,प्रवीण आल्हाट,विशाल कोळगे,सचिन आरणे,आंदोलनासाठी मोठ्या संख्येने महिला व युवक उपस्थित आहेत.

COMMENTS