Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विद्युत सुरक्षा दिनानिमित्त प्रबोधनासाठी बाईक व कार रॅली 

नाशिक : केंद्र शासनाच्या निर्देशानुसार गुरुवार २६ जून २०२५ हा दिवस "विद्युत सुरक्षा दिवस" म्हणून साजरा करण्यात आला. या दिनानिमित्त  महावितरण कंपन

शेतकऱ्यांना आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात : उपमुख्यमंत्री पवार
‘एआय’ आणि मनोरंजन क्षेत्रात भारताला नेतृत्वाची संधी : मुख्यमंत्री फडणवीस
जामखेड : कलाकेंद्र बंद केले; जीवे मारण्याची धमकी
Displaying Raly 26.06.2025_2.jpeg

नाशिक : केंद्र शासनाच्या निर्देशानुसार गुरुवार २६ जून २०२५ हा दिवस “विद्युत सुरक्षा दिवस” म्हणून साजरा करण्यात आला. या दिनानिमित्त  महावितरण कंपनी, विद्युत निरीक्षक कार्यालय व विद्युत कंत्राटदार संघटना (ECAM) नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आज गुरुवारी सकाळी १० वाजता विद्युत भवन नाशिक रोड येथून विद्युत सुरक्षा जनजागृतीसाठी बाईक व कार रॅलीचे आयोजन करण्यात आले. नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता सुंदर लटपटे यांच्या हस्ते झेंडी  दाखवून रॅलीची सुरुवात करण्यात आली. 

दि. २६ जून रोजी विद्युत सुरक्षा दिनानिमित्त विद्युत सुरक्षेविषयक सर्वांमध्ये जनजागृती करून त्या माध्यमातून “स्मार्ट एनर्जी सेफ नेशन” ही संकल्पना फलक रॅलीत अधिकारी, कर्मचारी यांनी हाती घेत जनजागृती करण्यात आली. बदलत्या तंत्रज्ञानासोबत सर्वोच्च सुरक्षा व हरित ऊर्जा सोबत शाश्वत विकास साधणे हा त्यामागील उद्देश होता. या प्रबोधनपर रॅलीत महावितरण कंपनीचे अधिकारी, अभियंते, कर्मचारी व सर्व विद्युत क्षेत्रात कार्यरत कंत्राटदार व कर्मचारी हे सहभागी होते. महावितरणचे परिमंडळ 

कार्यालय विद्युत भवन नाशिक रोड येथून या रॅलीला सुरुवात होऊन उपनगर, काठे गल्ली सिग्नल, तपोवन, टाकळी रोड या मार्गाने प्रबोधन करीत जेलरोड मार्गे विद्युत भवन, नाशिकरोड येथे रॅलीची सांगता झाली. यावेळी अधिक्षक अभियंता राजेश थूल, विद्युत निरीक्षक भागवत उगले, कार्यकारी अभियंते योगेश निकम, नंदकिशोर काळे, चेतन वाडे, जगदीश जाधव, अधिकारी, कर्मचारी व कंत्राटदार संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते. 

COMMENTS