Homeताज्या बातम्यादेश

बिहार विधानसभा निवडणूक दोन टप्प्यात ; 6 आणि 11 नोव्हेंबर रोजी होणार मतदान

पाटणा : गेल्या काही दिवसांपासून बिहार विधानसभा निवडणुकीचा बिगुल कधी वाजतो, त्याची प्रतीक्षा होती, सोमवारी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांन

डांबरीकरणासाठी आलेली सव्वा लाखाची खडी लंपास
माणिकपणे आणि माणुसकीने काम केल्याचे समाधान मोठे ः शंकरराव परदेशी
मराठी पाटी हवी म्हणजे हवी ः  राज ठाकरे
Election Commission of India announce by election for seven states with  Bihar Assembly Election | बिहार निवडणुकीसोबत मोठी घोषणा! या 7 राज्यांमध्ये  पार पडणार पोटनिवडणुका, वाचा कुठे ...

पाटणा : गेल्या काही दिवसांपासून बिहार विधानसभा निवडणुकीचा बिगुल कधी वाजतो, त्याची प्रतीक्षा होती, सोमवारी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी याबाबतची घोषणा केली असून, बिहार विधानसभा निवडणूक दोन टप्प्यात होणार असून 6 आणि 11 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे, तर 14 नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीची निवडणूक प्रक्रिया 40 दिवस चालेल. या निवडणुकांसाठी एसआयआर अंतर्गत मतदार यादी अपडेट करण्यात आली आहे.

बिहारमध्ये एकूण 90 हजार 712 मतदान केंद्रे
निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, बिहारमध्ये एकूण 90,712 मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत, ज्यामध्ये प्रत्येक केंद्रावर सरासरी 818 नोंदणीकृत मतदार आहेत. यापैकी 76,801 मतदान केंद्रे ग्रामीण भागात आहेत, तर 13,911 शहरी भागात आहेत. सर्व मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग (100%) उपलब्ध आहे. याव्यतिरिक्त, मतदारांना चांगल्या सुविधा देण्यासाठी 1,350 मॉडेल मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत.

COMMENTS