बिग बॉस महेश मांजरेकरांनी केली नव्या चित्रपटाची घोषणा.

Homeताज्या बातम्यामनोरंजन

बिग बॉस महेश मांजरेकरांनी केली नव्या चित्रपटाची घोषणा.

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रयोगशील अभिनेता, दिग्दर्शक म्हणून महेश मांजरेकर(Mahesh Manjrekar) ओळखले जातत्. सतत काहीतरी नवीन करण्यावर त्यांचा भर असतो. आ

Jalgaon : या आमदाराचे सर्वत्र दोन नंबरचे धंदे- एकनाथ खडसे | Loknews24
16 महिन्यांच्या मुलीवर बापाने केला बलात्कार| LokNews24
इलेक्ट्रॉल बाॅंड बंदी : एक वस्तुस्थिती !

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रयोगशील अभिनेता, दिग्दर्शक म्हणून महेश मांजरेकर(Mahesh Manjrekar) ओळखले जातत्. सतत काहीतरी नवीन करण्यावर त्यांचा भर असतो. आता महेश मांजरेकर पुन्हा नवीन सिनेमा घेऊन येण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याविषयी माहिती दिली आहे. या नवीन सिनेमाचं नाव ‘निरवधी’ असं आहे. या चित्रपटात महेश मांजरेकरांची लेक गौरी इंगवले पुन्हा एकदा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर तिच्यासोबत मराठी चित्रपटसृष्टीतील तगड्या कलाकारांच्या भूमिका आहेत. या चित्रपटात सुबोध भावे, उपेंद्र लिमये आणि गौरी इंगवले हे कलाकार झळकणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे सिनेमाचं लेखन आणि दिग्दर्शन महेश मांजरेकरांनी केलं आहे. सिनेमा पुढच्या वर्षी रिलीज होणार आहे.

COMMENTS