मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांच्या संपत्तीच्या चौकशीबाबतची याचिका न्यायालयाने फेटाळली. न्यायमूर्ती दिपांकर दत्ता या
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांच्या संपत्तीच्या चौकशीबाबतची याचिका न्यायालयाने फेटाळली. न्यायमूर्ती दिपांकर दत्ता यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी आज पार पडली. उद्धव ठाकरे आणि कुटुंबाने बेहिशोबी मालमत्ता जमवली असल्याचा आरोप करत गौरी भिडे यांनी आणि त्यांच्या वडिलांनी ही याचिका दाखल केली होती. उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांनी एवढी मालमत्ता जमवली आहे, त्यांच्या उत्पन्नाचा नेमका स्त्रोत काय आहे याची चौकशी व्हावी. त्यांच्याकडे असलेली संपत्ती कुठू आली याची माहिती सर्वांना मिळायला हवी, असा आरोप भिडे यांनी केला होता. प्रबोधन प्रकाशन प्रायव्हेट लिमिटेडच्या सामना वृत्तपत्राचा कोरोना काळातील टर्नओव्हर 42 कोटी रुपये होता. या काळात सर्व वृत्तपत्र तोट्यात असताना सामना नफ्यामध्ये होता. या सर्वांची चौकशी व्हावी अशी मागणी याचिकाकर्त्यांनी हायकोर्टात केली होती.
COMMENTS