शिराळा / प्रतिनिधी : चांदोली धरणातुन शेतीसाठी डाव्या कालव्यातुन पाणी सोडण्यात आले आहे. ते पाणी जेवढ्या क्षमतेने सोडले आहे त्या पटीत पुढे जात आहे
शिराळा / प्रतिनिधी : चांदोली धरणातुन शेतीसाठी डाव्या कालव्यातुन पाणी सोडण्यात आले आहे. ते पाणी जेवढ्या क्षमतेने सोडले आहे त्या पटीत पुढे जात आहे का हा ही एक सवाल उपस्थितीत होत आहे. कारण खिरवडे पंप हाऊसपर्यंत पाणी आले आहे. खरे पण हेच पाणी खुजगांव येथील वारणा जलसेतुमधून शाहुवाडी तालुक्यातील शेतीसाठी हे पाणी उजव्या कालव्यातून पुढे प्रवाहीत होते. पण हे पाणी शेतकर्यांच्या बांधावर पोहचेपर्यंत गळतीमुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे.
खुजगाव, ता. शिराळा येथील शेतकर्यांच्या उभ्या पिकात लाखो लिटर पाणी साचले असून ओढ्याने वाहुन जात आहे. त्यामुळे येथील शेतीचे मोठे नुकसान होत आहे. सध्या धरणातून पहीले आर्वतन सुरु केले आहे. मात्र, खुजगांव येथील मेणी जलसेतूमधून त्या पाण्याची गळती होत आहे. जलसेतूचे जॉईन्ट रबर निकामी होवुन पाण्यास गळती लागली असल्याचे पांटबंधारे विभागाचे अधिकारी सागंत आहेत. मात्र, हे गळतीचे प्रमाण किंवा दुरुस्तीची कामे आर्वतन सुरु करण्या आगोदर अधिकारी का बघत नाहीत? असा सवाल शेतकरी वर्गामधून होत आहे. पाटबंधारे विभाग याकडे डोळे झाक करत आहेत का? असाही सवाल उपस्थितीत होत आहे. यामुळे शेतीसाठी सोडलेले पाणी किती वापरात येत आहे. हे गळती झालेले पाणी शेतात साठून शेतास तळ्याचे स्वरूप आल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. तसेच त्यातील उभे पिक काढताना मोठी कसरत करावी लागत आहे. तरी हे शेतात साठणारे व विनाकारण वाहुन जाणारे पाणी तात्काळ बंद करणेची मागणी शेतकरी वर्गातुन होत आहे.
अनेक वर्षापासुन वारणा कालव्याच्या पाण्यांची गळती कराड-रत्नागिरी महामार्गावर खुजगांव हद्दीत होत आहे. काही वेळेला गळती होणारे पाणी रस्त्यावर ही पसरत आहे. आता या रस्त्याचे कराड-रत्नागिरी महामार्गात रुपांतर झाले असून कामेही पुर्ण होवुन वाहतुक सुरु आहे. मात्र, या जल सेतूजवळ धोकादायक वळण रस्ता असुन या ठिकाणी रस्ता रुंदीकरण केल्याने दुहेरी रस्ता झाला आहे. परंतू रस्त्यावर जलसेतुच्या गळतीचे पाणी मोठ्या प्रमाणात पडत आहे. हे पाणी काढण्यासाठी सिमेंटच्या गटारी बांधल्या आहेत. पंरतू र्दुदैव असे की हे गटारीत पाणी जात नसून रस्त्यावरच येत आहे. हे प्रशासनाचे मोठे अपयश आहे. ते लपविण्याचा प्रशासन आटोकाट प्रयत्न करत आहे. परंतू झालेल्या चुका मात्र तशाच ठळक दिसत आहेत. त्यांच्या चुकीचे फळ जनता भोगत आहे. पाटबंधारे विभाग मात्र बघ्याची भूमिका घेत आहे.
मेणी जलसेतूची दुरुस्ती न केल्याने जलसेतुचे पाणी रस्त्यावर व शेतात पडत असल्याने खुजगाव, ता. शिराळा येथील मुख्य महामार्गाजवळ मेणी जलसेतुच्या पाण्याची गळती होऊन शेतीला तळ्याचे स्वरूप आले आहे. या ठिकाणी शेतकर्यांना काम करताना कसरत करावी लागत आहे.
धनाजी सावंत (शेतकरी खुजगांव)
कालव्यातून होणारी वारंवार गळती थांबवण्यासाठी वरिष्ठांकडे प्रस्ताव सादर करणार असून यावर लवकरच योग्य तो उपाय करून गळती थांबवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
एस. ए. मुजावर (कनिष्ठ अभियंता, वारणा पाटबंधारे विभाग कोकरूड)
COMMENTS