Homeताज्या बातम्यादेश

केरळमध्ये मोठा स्फोट, एकाचा मृत्यू, 35 जण जखमी!

केरळ प्रतिनिधी - केरळमधील कोची येथील कलामासेरी येथील जामरा इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटरमध्ये स्फोट झाला आहे. या स्फोटात एकाचा मृत्यू झाला असून

परमबीर सिंह यांना न्यायालयाने फटकारले ; याचिका फेटाळली; कनिष्ठ न्यायालयात जाण्याचा सल्ला
मे अखेरीस भुयारी मेट्रोतून प्रवास शक्य
पद्माकर वळवी यांची काँगे्रसला सोडचिठ्ठी

केरळ प्रतिनिधी – केरळमधील कोची येथील कलामासेरी येथील जामरा इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटरमध्ये स्फोट झाला आहे. या स्फोटात एकाचा मृत्यू झाला असून 20 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. कन्व्हेन्शन सेंटरमध्ये सकाळी 9.40 वाजता हा स्फोट झाला. स्फोट झाला तेव्हा कन्व्हेन्शन सेंटरमध्ये सार्वजनिक कार्यक्रम सुरू होता. स्फोटानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. पोलिसांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे. पाच जखमींची प्रकृती चिंताजनक आहे. प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार, काही मिनिटांतच तीन स्फोट झाले. एका प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, प्रार्थना संपल्यानंतर काही सेकंदात हा स्फोट झाला. पहिला स्फोट हॉलच्या मध्यभागी झाला. काही सेकंदांनंतर, हॉलच्या दोन्ही बाजूला एकाच वेळी आणखी दोन स्फोट झाले

COMMENTS