जळगावात एकनाथ खडसेंसह राष्ट्रवादीला मोठा धक्का

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जळगावात एकनाथ खडसेंसह राष्ट्रवादीला मोठा धक्का

नगराध्यक्षांसह 9 नगरसेवक 6 वर्षांसाठी निलंबित

जळगाव प्रतिनिधी  - भुसावळ नगरपालिके(Bhusawal Municipality) मध्ये राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसें(Eknath Khadse) ना मोठा धक्का बसला आहे. खडसे यांचे

एकनाथ खडसेंचा मुख्यमंत्र्यांना भावनिक फोन
कार्यकर्त्याने थेट भाषण करणाऱ्या एकनाथ खडसेंच्या हातातून माईक हिसकवला  
अखेर एकनाथ खडसे स्वगृही परतण्याचे संकेत !

जळगाव प्रतिनिधी  – भुसावळ नगरपालिके(Bhusawal Municipality) मध्ये राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसें(Eknath Khadse) ना मोठा धक्का बसला आहे. खडसे यांचे समर्थक माजी नगराध्यक्ष रमण भोळे यांच्यासह 9 नगरसेवक 6 वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला हा मोठा धक्का मानला जात आहे. भुसावळ नगरपालिकेच्या अपात्र नगरसेवकांचा निकाल नगर विकास विभागाने कायम ठेवला आहे. त्यामुळे भुसावळच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. नगर विकास मंत्रालयातर्फे सदर निकाला बाबत आदेश पारीत करण्यात आला असून नगरपालिकेचे अध्यक्ष रमण भोळे, सदस्य सविता मकासरे, लक्ष्मी मकासरे, प्रमोद नेमाडे, मेघा वाणी, बोधराज चौधरी, शोभा नेमाडे, किरण कोलते, शैलजा नारखेडे यांना अपात्र घोषित केले आहे.

COMMENTS