Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कर्नाटक विधानसभेत बिदरला मोठे पद मिळणार

मेहकर प्रतिनिधी - भालकी येथील काँग्रेसचे उमेदवार ईश्वर खंड्रे मताधिक्यानी निवडून येऊन त्यांच्या माध्यमातून कर्नाटक विधानसभेत बिदरला मोठे पद मिळण

कोल्हापुरमध्ये धक्कादायक घटना; रिक्षाचालकाने महिलेला फरफटत नेलं
शेतरस्ते अतिक्रमणमुक्तीसाठी प्रशासनाकडून मोहीम
कोकणात सापडले वर्षांपूर्वीची हत्यारे

मेहकर प्रतिनिधी – भालकी येथील काँग्रेसचे उमेदवार ईश्वर खंड्रे मताधिक्यानी निवडून येऊन त्यांच्या माध्यमातून कर्नाटक विधानसभेत बिदरला मोठे पद मिळणार असल्याची ग्वाही माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी दिली. सीमा भागातील भालकी तालुक्यातील सायगाव सर्कल मेहकर येथील सभेत भालकीचे विधानसभेचे काँग्रेस उमेदवार ईश्वर खंड्रे यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते.
यावेळी खंड्रे यांच्या शपथ विधीला आम्ही येणार असे बिदर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बस्वराज दाबशेट्टी यांनी म्हंटल.े आम्ही शेजार धर्म पाळतो, काँग्रेसच्या जाहीरनाम्यात महीलाना मोफत बस प्रवास, महिलांना प्रति महिना दोन हजार, दहा किलो तांदुळ दोनशे युनिट वीज मोफत, पदवीधर तरुणांना महिना तीन हजार रुपये पदवी भत्ता, अशा अनेक सुविधा आहेत असे मान्यवरांनी यावेळी सांगितले. यावेळी प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस आशोक पाटील निलंगेकर, सरचिटणीस अभय साळुंके, प्रविण हाणमशेट्टी, बन्सीलाल बोरोळे, मारोतीराव मगर, हंसराज पाटील, दिलीप पाटील, विद्यवान मंगणे आदी उपस्थित होते.

COMMENTS