गोंदवले / वार्ताहर : माण तालुक्यातील पिंपरी, ता. माण नजीक रात्री दुचाकी आणि पिकप जीप यांच्या समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार रंगा ब

गोंदवले / वार्ताहर : माण तालुक्यातील पिंपरी, ता. माण नजीक रात्री दुचाकी आणि पिकप जीप यांच्या समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार रंगा बिरा राजगे (वय 30, रा. पिंपरी) हा जागीच ठार झाला. या अपघाताची नोंद म्हसवड पोलीस ठाण्यात झाली असल्याची माहिती सपोनि सखाराम बिराजदार यांनी दिली.
रंगा बिरा राजगे हा पिंपरी येथील रहिवासी असून पिंपरी पासून दोन किलोमीटर वर मनकर्णवाडी हद्दीत असणार्या लोणार वस्ती नजीक राजगे वस्तीवर राहण्यासाठी आहेत. रंगा बिरा राजगे हे त्यांच्या दुचाकीवरून रात्री साडेनऊ वाजता त्यांच्या शेताला पाणी देण्यासाठी ते मोटर चालू करण्यासाठी पिंपरीकडे निघाले होते. त्याचवेळी महिंद्रा पीकअप जीप म्हसवडकडून कोंबड्या घेऊन दहिवडी जात असताना या दोन्ही भरधाव वाहनांचा समोरासमोर अपघात झाला. या अपघातात दोन्ही गाड्या एकमेकावर आदळल्याने मोठा आवाज झाला. आवाजाच्या दिशेने पिंपरीच्या ग्रामस्थांनी धाव घेतली असता दुचाकीचे मोठे नुकसान झाले होते. तसेच दुचाकीस्वार रंगा बिरा राजगे यांचा जागीच मृत्यू झाला होता. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. म्हसवड म्हसवड पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेवून ग्रामस्थांच्या मदतीने दोन्ही वाहने बाजूला घेत इतर वाहतूक सुरळीत केली. अपघाताची फिर्याद पाडुंरंग जिजाबा राजगे यांनी म्हसवड पोलीस ठाण्यात दाखल केली. सपोनि सखाराम बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.
COMMENTS