सातपूर :- माती कला बोर्ड पूर्ण क्षमतेने कार्यान्वीत करण्यासाठी प्रयत्न केले जातील. तसेच कुंभार समाजाला 500 ब्रास माती मोफत कशी मिळेल यासाठी मंत्र

सातपूर :- माती कला बोर्ड पूर्ण क्षमतेने कार्यान्वीत करण्यासाठी प्रयत्न केले जातील. तसेच कुंभार समाजाला 500 ब्रास माती मोफत कशी मिळेल यासाठी मंत्रालयात बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्यात येईल असे ठोस आश्वासन अन्न,नागरी पुरवठा मंत्री छगनराव भुजबळ यांनी दिले.
नाशिक जिल्हा व महाराष्ट्र कुंभार समाज विकास समितीच्यावतीने लक्ष्मीनारायण भवन, राणेनगर येथे राज्यातील समाज बांधवांना समाजभूषण पुरस्कार व विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.भुजबळ यांनी पुढे सांगितले की,कुंभार समाजाला नवीन तंत्रज्ञान देण्यासाठी प्रशिक्षण केंद्राची गरज आहे.त्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करण्यात येईल.कुंभार समाज ओबीसी समाजात मोडतो.ओबीसी घटकांमध्ये कुंभार समाज लोकसंख्येने मोठा समाज असून ओबीसींच्या प्रश्नावर लढा देण्यासाठी पुढं आल पाहिजे.अध्यक्षस्थानी महाराष्ट्र कुंभार समाज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सतीश दरेकर होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार देवयानी फरांदे,महेश हिरे,सुरेश कोते, शरद आहेर,डॉ.दिलीप मेनकर,के.के.चव्हाण,वसंतराव घोडनदीकर,सुरेश बहाळकर,उत्तमराव काळे,रमेश उपाध्ये,गणेश आहेर, अशोक सोनवणे आदिंसह राज्य पदाधिकारी उपस्थित होते. प्रास्तविक राज्य कार्याध्यक्ष रमाकांत क्षिरसागर यांनी केले.स्वागत जिल्हाध्यक्ष सोमनाथ सोनवणे यांनी केले.सूत्रसंचालन पुंडलिक सोनवणे यांनी केले. शहराध्यक्ष गणेश आहेर यांनी आभार मानले.यावेळी आप्पा जोर्वेकर,प्रवीण सोनवणे,अरविंद क्षीरसागर, अशोक जाधव,सुभाष कुंभार,वसंत गाडेकर,अरविंद क्षीरसागर,शामराव जोंधळे,राधेश्याम गायकवाड,रमेश राजापुरे, अंजली सोनवणे,सुवर्णा जाधव,सविता जगदाळे, रत्ना सोनवणे,मारुती रसाळ,रोशनी सोनवणे, बाळासाहेब जोर्वेकर,आदिंसह जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.
नाशिकला प्रथमच कुंभार समाजाचे दैवत असलेल्या राष्ट्रसंत श्री गोरा कुंभार यांचे भव्यदिव्य मंदिर उभारण्यात येणार आहे.त्यासाठी शासनाकडून एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करुन घेतला आहे.लवकरच मंदिर कामाचे भूमिपूजन करण्यात येणार असल्याची माहिती आमदार देवयानी फरांदे यांनी यावेळी दिली.
यांचा झाला सन्मान – लिज्जत पापड उद्योग समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश कोते(पुणे),विश्वनाथ आहेर (ओझर),किसनराव जाधव (सिन्नर) यांना जीवनगौरव तर सेवानिवृत्त शासकीय अधिकारी नारायण करंगळे,पत्रकार गोकुळ सोनवणे (नाशिक),सुभाष कुंभार,रतिलाल कुंभार (शिरपूर),सेवानिवृत्त पोलिस अधिकारी भगवान सूर्यवंशी यांना समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
COMMENTS