Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाकडे जाणाऱ्या रस्त्याचे भूमिपूजन संपन्न 

नाशिक :  यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ ते विद्यापीठ फाटा अशा दोन किलोमीटर अंतर असलेल्या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यासाठी महाराष्ट्र

सुसाईड नोट लिहित विवाहितेची आत्महत्या | LOKNews24
प्रहारच्या मदतीने मिळाले निराधार महिलेस घरकुल
अनियंत्रित ट्रकने 10 वाहनांना उडवले

नाशिक :  यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ ते विद्यापीठ फाटा अशा दोन किलोमीटर अंतर असलेल्या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून रु. 6 कोटीचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. सदर रस्त्याचे भुमिपूजन देवळाली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार तथा मुक्त विद्यापीठाच्या व्यवस्थापन मंडळाच्या सदस्या श्रीमती सरोज आहिरे आणि मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू मा. प्रा. संजीव सोनवणे यांचे हस्ते करण्यात आले 

याप्रसंगी गोवर्धन गावचे सरपंच गोविंद डंबाळे, उपसरपंच बाळासाहेब लांबे, ग्रामपंचायत  सदस्य दत्तु डंबाळे, ज्ञानेश्वर गाडे, बापु डंबाळे, सुजर ढवळे, गोविंद बेंडकुळे, लंकाताई बदादे, रंजनाताई मधे, वैशाली जाधव, नंदाताई वायचळे, शोभा डंबाळे, माया जाधव, विमल राऊत,  ग्रामसेवक श्री. प्रकाश खैरणार, माजी सरपंच पी. के. जाधव, श्री. किशोर जाधव, नरेंद्र जाधव, विद्यापीठाचे कुलसचिव श्री. भटुप्रसाद पाटील, वित्त अधिकारी गोविंद कतलाकुटे, संचालक डॉ. प्रकाश देशमुख, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता श्री. किरण पवार, विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी श्री. महेंद्र बनसोडे, श्री. कैलास मोरे,  आदी विद्यापीठ अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

COMMENTS