अहमदनगर/प्रतिनिधी : भिंगारला बिंगो जुगार अड्ड्यावर छापा टाकून तिघांवर गुन्हा दाखल करून 18 हजार 550 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई स्थानि
अहमदनगर/प्रतिनिधी : भिंगारला बिंगो जुगार अड्ड्यावर छापा टाकून तिघांवर गुन्हा दाखल करून 18 हजार 550 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने भिंगार येथील चेतना वाईनशॉपच्या पाठीमागे बाजारतळावर केली.
याबाबत माहिती अशी की, भिंगार येथील चेतना वाईनशॉपच्या पाठीमागे बाजारतळावर बिंगो नावाचा हारजीतचा जुगार लोकांना आकडे व पैसे लावून देऊन त्यांच्याकडून पैसे घेऊन खेळवला जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली. ही माहिती त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना देऊन या माहितीबाबत खात्री करण्यास सांगितले. एलसीबीच्या पोलिस पथकाने मिळालेल्या माहितीबाबत खात्री केली. खात्री होताच एलसीबी पोलिस पथकाने त्या ठिकाणीं छापा टाकला. या कारवाईत बिंगो नावाचा हारजीतचा जुगार लोकांना आकडे व पैसे लावून देऊन त्यांच्याकडून पैसे घेऊन खेळताना व खेळविताना तिघे मिळून आले. त्यांच्याकडून 5 हजार रुपयांचा एलसीडी, 5 हजार रुपये सीपीयु, 300 रुपयांचा कीबोर्ड, 50 रुपयांचा बॅनर जप्त केला. तर त्यांच्या अंगझडतीत अजय बोरा याच्याकडे 4 हजार 200 रुपये, भूषण खळे याच्याकडे 2 हजार रुपये, तर बंटी मोरे याच्याकडे 2 हजार रुपये असा एकूण 18 हजार 550 रुपये रोख रक्कमेसह मुद्देमाल मिळून आला.
याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस नाईक संदीप जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात अजय रामपाल बोरा, भूषण नंदकुमार खळे व बंटी राजू मोरे यांच्याविरुध्द मुंबई जुगार कायदा कलम 12(अ) प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील कारवाई भिंगार कॅम्प पोलिस करीत आहे.
COMMENTS