Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भिंगाणगाव चार दिवसांपासून अंधारात

वादळामुळे कुक्कुटपालन जमीनदोस्त

श्रीगोंदा शहर : भिंगाण खालसा, दुमाला, गावाला वादळी वार्‍याने मोठा फटका दिला आहे. शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, विजेच्या तारा दे

  संशोधन क्षेत्रातील वाड;मयचौर्य नव संशोधकांसाठी धोक्याचे- प्राचार्य डॉ. अर्चना आदिक पवार
पालकमंत्री विखेंनी घेतला पंतप्रधान मोदींच्या सभेच्या तयारीचा आढावा
शेवगावमध्ये 23 नोव्हेंबरला मनोज जरांगे यांची विराट सभा

श्रीगोंदा शहर : भिंगाण खालसा, दुमाला, गावाला वादळी वार्‍याने मोठा फटका दिला आहे. शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, विजेच्या तारा देखील तुटल्या आहेत. त्यामुळे भिंगाणगाव मंगळवार 14 मेपासून म्हणजेच चार दिवसांपासून अंधारात आहेत.  गावातील संतोष लोखंडे यांच्या घरावर मोठे झाड उन्मळून पडले, त्यामुळे त्यांचे राहते घराचे मोठे नुकसान झाले झाले आहे. तसेच गावाच्या लगत बबन निवृत्ती शिंदे यांचे कुक्कुटपालन अक्षरशा जमीनदोस्त झाले आहे. तसेच राजू शेळके यांचे घराची पडवी उडून गेलेली आहे, गावातील मेन लाईन सह उपलाईन पोल जमीनदोस्त झाले आहे. महेंद्र शेंडगे यांच्या घरावर लाईटच्या तारा पडल्या आहेत. चार दिवस झाले गाव अंधारात आहे. गावचे तलाठी श्रीमती निकाळजे यांनी तीन ठिकाणी जाऊन पंचनामे केले, तसेच वरिष्ठांना अहवाल पाठवले आहेत. गावामध्ये वित्तहानी मोठ्या प्रमाणात झालेले आहे. भिंगाण गाव अंधारातून उजेडात कधी येईल याची मोठी शंका आहे, असे संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष नाना शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना माहिती दिली.

COMMENTS