Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विजयस्तंभासह वढुतही लोटला भीमसागर

छत्रपती संभाजी महाराज व गोविंद गोपाळांच्या समाधीचे दर्शनशिक्रापुर / प्रतिनिधी : कोरेगाव भीमा, ता. शिरुर येथिल ऐतिहासीक विजयस्तंभास 208 व्या

नेवासा तालुका जिल्हा परिषद सेवा निवृत्त कर्मचारी संघटनेच्या उपाध्यक्षपदी “भारतपुरी गोसावी” यांची निवड
वारकर्‍यांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची संबंधित विभागांनी दक्षता घ्यावी : पालकमंत्री
वादळी वार्‍याने आनंददायी माध्यमिक निवासी आश्रमशाळेचे पत्रे उडाले; लाखो रुपयांचे नुकसान

छत्रपती संभाजी महाराज व गोविंद गोपाळांच्या समाधीचे दर्शन
शिक्रापुर / प्रतिनिधी : कोरेगाव भीमा, ता. शिरुर येथिल ऐतिहासीक विजयस्तंभास 208 व्या शौर्यदिनी मानवंदना देण्यासाठी येणारे अनुयायी वढु बुद्रुक येथील छत्रपती संभाजी महाराज व गोविंद गोपाळ यांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेण्यासाठी येत असल्याने वढुतही मोठ्या प्रमाणावर भीमसागर लोटल्याचे चित्र दिसत होते.
कोरेगाव भीमा, ता. शिरुरसह पेरणे फाटा येथील ऐतिहासीक विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी आज दिवसभरात लाखो भीमसैनिकांनी हजेरी लावत मानवंदना दिली. विजयस्तंभ येथील मानवंदने नंतर हे भीमसैनिक कोरेगाव भीमा येथुन पीएमपीएलच्या बसमधुन वढु येथे देखील जात होते. वढु बुद्रूक येथे येत भीमसैनिकांनी छत्रपती संभाजी महाराज व गोविंद गोपाळ गायकवाड यांच्या समाधीचे देखील दर्शन घेतले. आज शौर्यदिनाच्या पार्श्‍वभूमिवर सदर ठिकाणी असलेल्या पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आलेली होती. छत्रपती संभाजी महाराज यांचे समाधीस्थळ व गोविंद गोपाळ यांचे समाधीस्थळावर बॅरिगेटींग करण्यात आले होते. वढुमध्ये आज सकाळ पासुनच दोन्ही समाधीस्थळावर अभिवादन व नतमस्तक होण्यासाठी, भारत मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष वामन मेश्राम यांसह मोठ्या प्रमाणावर भीमसैनिक उपस्थित झाले होते. यावेळी आलेल्या अनेक समाज बांधवांनी गोविंद गोपाळ गायकवाड यांची समाधी पाहून नाराजी व्यक्त केल्याचे सांगत समाधीचा शासनाने विकास व सुधारणा करावी, असे गोविंद गोपाळ गायकवाड यांचे वंशज पांडुरंग गायकवाड यांनी सांगितले. पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून या ठिकाणी देखील अभिवादन कार्यक्रम शांततेत पार पडला आहे.

COMMENTS