Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आनंद शिंदेंच्या सुरेल सुरात मंत्रमुग्ध झाला भीममसागर…!

बीड प्रतिनिधी- भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या सुरेख संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या शिव, फुले, आंबेडकर यांच्या संयुक्ति

कोपरगाव शहरातील अनाधिकृत अतिक्रमणे जमीनदोस्त
36 लाख व्हाट्सअँप अकाउंट बंद
केडगाव उपनगरातून हळद फिटण्या अगोदर नववधू पसार

बीड प्रतिनिधी- भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या सुरेख संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या शिव, फुले, आंबेडकर यांच्या संयुक्तिक जयंती उत्सवासाठी हजारोंच्या संख्येत उपस्थित असलेला अवघा भीमसागर ख्यातनाम गायक आनंद शिंदे यांच्या सुरेल सुरांनी मंत्रमुग्ध झाला. शनिवारी सायंकाळी भाजपा राष्ट्रीय सचिव लोकनेत्या पंकजाताई मुंडे, आ. सुरेश धस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी छत्रपती शिवाजी महाराज , महात्मा ज्योतीराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्तिक जयंती उत्सव साजरा केला. या कार्यक्रमासाठी ख्यातनाम गायक आनंद शिंदे यांचा शिंदेशाही बाणा या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रेरणादायी आणि सुरेल गीत गायनाच्या कार्यक्रमातून समता आणि समरसतेचा संदेश देत हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या भीमप्रेमी समवेत महामानवांना अभिवादन करण्यात आले.
महाराष्टाराला थोर महापुरुषांची परंपरा लाभली आहे. महापुरुषांचे कार्य आणि विचारधारा सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचली पाहिजे, या प्रांजळ हेतूने राजेंद्र मस्के यांनी आपल्या सुरेख संकल्पनेतून पहिल्यांदाच शिव, फुले, आंबेडकर जन्मोत्सवाचे भव्य दिव्य आयोजन केले होते. भीमप्रेमींनी मोठ्या संख्येत आपली हजेरी लावली होती. कुणाचीही गैरसोय होणार नाही यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून आपली कंबर कसली होती. या सर्व प्रयत्नांना पूर्णपणे यश आले असून, लोकनेत्या पंकजाताई यांनी राजेंद्र मस्के यांचे दर्जेदार नियोजन पाहून जाहीरपणे कौतुक करत पाठ थोपटली. त्या म्हणाल्या की,  छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले ही तीन विचार जन्मल्यामुळेच आज आपण सर्वजण गुण्यागोविंदाने एकत्रित वावरत आहोत. तर भारतीय जनता पार्टी चे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के शिव, फुले, आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती उत्सवानिमित्त आपणा सर्वांना एकत्रित करून सोशल इंजिनिअरिंग करण्यात मोठे यश प्राप्त केले आहे. पंकजाताई यांनी उपस्थित असलेल्या माता भगिनी आणि सर्व भीमप्रेमींचे स्वागत करत आभार व्यक्त केले. या प्रसंगी आ. सुरेश धस,मा.मंत्री प्रा.सुरेश नवले,पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुरेश साबळे,सर्जेराव तांदळे,नवनाथ शिराळे,शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे,समता परिषदेचे कल्याण काका आखाडे,दिलीपराव गोरे,जि.प. उपाध्यक्षा जयश्रीताई मस्के, चंद्रकांत फड , प्रा.देविदास नागरगोजे,विक्रांत हजारी, जगदीश गुरखुदे, अशोक लोढा, अजय सवाई,डॉ. लक्ष्मण जाधव,अनिल चांदणे,दीपक थोरात, ड.राहुल मस्के, चंद्रकांत नवले,विलास बामणे,भाऊसाहेब सावंत, उत्तरेशवर घोडके, नागेश पवार,शंतीनाथ डोरले,संभाजी सुर्वे,डॉ जयश्री मुंडे, छाया मिसाळ, ड.संगीता धसे,शीतल राजपूत आदी मान्यवर पत्रकार, व्यापारी, भाजपा व  विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

COMMENTS