Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संस्कृतीमध्ये भाषा व कलांचा मोठा वाटा : हांडे

दादा पाटील महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन कर्जत : “संस्कृती आणि संस्कार यांचा उत्तम मिलाप लोकसाहित्यात आढळतो. संस्कृतीमध्ये भाषा व क

महाराष्ट्र राज्य कबड्डी संघात यशराज खुरंगेची निवड
न्यायालयाला अतिरिक्त मजला; न्यायाधीशांसाठी नवीन कक्ष
पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन

दादा पाटील महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन

कर्जत : “संस्कृती आणि संस्कार यांचा उत्तम मिलाप लोकसाहित्यात आढळतो. संस्कृतीमध्ये भाषा व कलांचा मोठा वाटा असून जनमानसातील संस्कृती म्हणजे लोककला, लोकसाहित्य व लोकसंस्कृती होय. काळानुरूप संस्कृती बदलत राहते,” असे मत ख्यातनाम चित्रकार, शिल्पकार, कवी व संशोधक भास्कर हांडे (हॉलंड) यांनी व्यक्त केले. ते रयत शिक्षण संस्थेचे दादा पाटील महाविद्यालय, कर्जत येथे आयोजित दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी आभासी पद्धतीने बोलत होते.

मराठी, हिंदी व इंग्रजी विभागांच्या संयुक्त विद्यमाने ‘आधुनिक परिस्थितीत लोककला, लोकसाहित्य आणि लोकसंस्कृती : आव्हाने आणि संधी’ तसेच वाणिज्य, अर्थशास्त्र व बी.बी.ए. (सीए) विभागांतर्गत ‘विकसित भारत २०४७ : वाणिज्य, अर्थशास्त्र व व्यवस्थापनाच्या माध्यमातून शाश्वत आणि सर्वसमावेशक विकास’ या विषयावर सदर आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सुधीर लंके, डॉ. सदानंद भोसले, डॉ. सुहास निंबाळकर, डॉ. एकनाथ मुंढे, डॉ. सुधाकर शेलार आदी मान्यवर उपस्थित होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. संजय नगरकर होते.

सकाळच्या सत्रात कवी, गीतकार व चित्रपट अभिनेता बाबासाहेब सौदागर यांनी ‘हिरव्या ऋतूंचा रंग महाल : लोकगीतांकडून चित्रपट गीतांकडे’ या विषयावर नांदी सादर केली. यावेळी कोपरगावचे छबुराव सुपेकर यांनी ‘वासुदेव आला’ तर शेवगावचे धर्मा कांबळे यांनी ‘किंगरी वादन’ सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.

आंतरराष्ट्रीय सत्रात डॉ. मधुमती कुंजल यांनी ‘मॉरिशसमधील लोककला व संस्कृती’ या विषयावर आभासी पद्धतीने मार्गदर्शन केले. मॉरिशसच्या बहुसांस्कृतिक परंपरेत भारतीय, आफ्रिकन व युरोपीय प्रभावांचा सुंदर संगम दिसून येतो, असे त्यांनी नमूद केले.

या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. प्रास्ताविक डॉ. संदीप पै यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा. राम काळे यांनी केले.

COMMENTS