माजलगाव प्रतिनिधी - केंद्रीय माध्यमिक शिक्षण विभागाने 20 एप्रिल 2023 रोजी काढलेल्या परिपत्रकाद्वारे सीबीएसई सलग्नित शाळेतील विद्यार्थ्यांना आदित्
माजलगाव प्रतिनिधी – केंद्रीय माध्यमिक शिक्षण विभागाने 20 एप्रिल 2023 रोजी काढलेल्या परिपत्रकाद्वारे सीबीएसई सलग्नित शाळेतील विद्यार्थ्यांना आदित्य बिर्ला सस्टेनेबिलिटी एक्सीलेरेटर यांच्या इंटरशिप कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले होते. प्राचार्य अन्वर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील भार्गवी गुंजकर, सारंग पवार, धनराज बजाज, यशश्री गायकवाड आणि समर्थ तौर या विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला होता. विशेष म्हणजे या स्पर्धेसाठी भारतातून 3000 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातून इयत्ता आठवीची विद्यार्थिनी भार्गवी गुंजकर हिने भारतातील पहिल्या 25 मध्ये स्थान मिळवून सिंदफणा पब्लिक स्कूलच्या शिरपेताच मानाचा तुरा रोवला आहे. याबद्दल भार्गवी आणि सिंदफणा पब्लिक स्कूल वर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
सीबीएसई ने आदित्य बिर्ला फॅशन अँड रिटेल च्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी ’सस्टेनेबिलिटी एक्सीलरेटर’ हा कार्यक्रम सुरू केला आहे. या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी उपकरणे तयार करणे आणि प्रकल्पाद्वारे प्रत्यक्ष अनुभव मिळवणे हे या सस्टेनेबिलिटी एक्सीलरेटरचे ध्येय आहे. विद्यार्थ्यांना हवामान बदल/कृतीसाठी मौल्यवान योगदान देण्यासाठी प्रोत्साहित करणे. कार्यक्रमातील फक्त 10 निवडलेल्या विद्यार्थ्यांना वैयक्तिकरित्या कामाच्या ठिकाणी अनुभव आणि शीर्ष कॉर्पोरेट कॅम्पसमध्ये इंटर्नशिप प्रदान करून ते अनुसरण करत असलेल्या शाश्वत पद्धतींबद्दल प्रोत्साहित करणार आहेत. भार्गवीने ’ड्रोन च्या साहाय्याने मराठवाड्यातील कोरडवाहू जमिनीवर वृक्ष लागवड ’ या विषयावर आपला प्रकल्प यशस्वीरीत्या सादर केला. मागील तीन महिन्यापासून सुरू असलेल्या या कार्यक्रमात भार्गवीने एकूण 15 वेगवेगळ्या चाचण्या पार करत हे यश प्राप्त केले आहे. हा प्रकल्प तयार करताना भार्गवीने तीस शेतकर्यांच्या मुलाखती घेतल्या. तसेच वन विभागातील वनरक्षक अधिकारी एल. जी. वरवडे व दत्तात्रय शेळके यांनी त्यांच्या मुलाखतीतून या प्रकल्पाचे फायदे आणि मर्यादा यावर चर्चा केली. भार्गवीच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आमदार प्रकाश सोळंके, उपाध्यक्ष वीरेंद्र सोळंके, सचिव मंगलाताई सोळंके, समन्वयक नीला देशमुख, प्राचार्य अन्वर शेख, उपप्राचार्य राहुल कदम, प्रकल्प समन्वयक विजय फासाटे,संगणक विभाग प्रमुख राजेश कुमार सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
COMMENTS