Homeताज्या बातम्यादेश

माजी पंतप्रधान नरसिंह रावसह तिघांना भारतरत्न

चौधरी चरणसिंह आणि शास्त्रज्ञ एमएस स्वामीनाथन यांचा समावेश

नवी दिल्ली ः बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर केल्यानंतर केंद्र सरकार

नऊ बालकांची हत्या करणाऱ्या गावित बहिणींची फाशी रद्द | LOKNews24
गुजरातमधील अरवली जिल्ह्यात भीषण अपघात
आमदार थोरात यांच्या यशोधन कार्यालयाकडून निमज येथील लष्करे कुटुंबाला मदतीचा हात

नवी दिल्ली ः बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर केल्यानंतर केंद्र सरकारने शुक्रवारी माजी पंतप्रधान नरसिंह राव, चौधरी चरण सिंह आणि शास्त्रज्ञ एमएस स्वामीनाथन यांना मरणोत्तर सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘भारतरत्न’ देण्याची घोषणा केली आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या ट्विटमध्ये नरसिंह राव, चौधरी चरण सिंह आणि शास्त्रज्ञ एमएस स्वामीनाथन यांच्या योगदानाबाबत सांगत त्यांना पुरस्कार जाहीर केला. माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंह यांना भारतरत्न जाहीर करताना नरेंद्र मोदी म्हणाले की, देशाचे माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंग यांना भारतरत्न देऊन सन्मानित करता आले, हे आमच्या सरकारचे भाग्य आहे. हा सन्मान त्यांनी देशासाठी दिलेल्या अतुलनीय योगदानाला समर्पित आहे. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य शेतकर्‍यांचे हित आणि हक्कासाठी समर्पित केले. त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री, देशाचे गृहमंत्री म्हणून राष्ट्र उभारणीला गती दिली. त्यांचे आमच्या शेतकरी बंधू- भगिनींप्रती असलेले समर्पण आणि आणीबाणीच्या काळात लोकशाहीप्रती असलेली त्यांची बांधिलकी संपूर्ण देशाला प्रेरणादायी आहे. माजी पंतप्रधान पीव्ही नरसिंह राव यांना भारतरत्नने सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती देताना आनंद होत आहे. एक प्रतिष्ठित विद्वान आणि राजकारणी म्हणून नरसिंह राव यांनी देशाची मोठ्या प्रमाणावर सेवा केली. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री आणि अनेक वर्षे संसद आणि विधानसभा सदस्य असताना त्यांनी केलेल्या कामामुळे ते आजही स्मरणात आहेत. भारताला आर्थिकदृष्ट्या प्रगत बनवण्यात आणि देशाच्या समृद्धी आणि विकासाचा भक्कम पाया रचण्यात त्यांचे दूरदर्शी नेतृत्व महत्त्वपूर्ण ठरले. नरसिंह राव हे देशाचे पंतप्रधान असताना भारताला जागतिक बाजारपेठेत मोठे यश मिळाले. त्यांच्या कार्यकाळात देशातील आर्थिक विकासाचे नवीन पर्व सुरू झाले. भारताच्या परराष्ट्र धोरण, भाषा आणि शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या योगदानाव्यतिरिक्त, त्यांना एक नेता म्हणून त्यांना ओळखले जाते. नरसिंह राव यांनी महत्त्वपूर्ण बदलांद्वारे भारताचे नेतृत्व केले, असेही नरेंद्र मोदी म्हणाले. सुमारे 68 वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या सर्वोच्च सन्मानाने आतापर्यंत 53 जणांना सन्मानित करण्यात आले आहे. स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल चक्रवर्ती राज गोपालाचारी, शास्त्रज्ञ चंद्रशेखर वेंकटरामन आणि सर्वपल्ली राधाकृष्णन यांना 1954 मध्ये पहिल्यांदा सन्मानित करण्यात आले होते. मोदी सरकारच्या 10 वर्षांच्या कार्यकाळात आतापर्यंत 10 जणांना भारतरत्न पुरस्कार देण्यात आला आहे.

COMMENTS