Homeताज्या बातम्यादेश

भारत जोडो यात्रेचा आज श्रीनगरमध्ये समारोप

पंतप्रधान नेहरूनंतर लाल चौकात राहुल गांधींनी फडकवला ’तिरंगा’

श्रीनगर/वृत्तसंस्था ः तब्बल 145 दिवसांपासून देशातील विविध शहर, राज्यातून सुरू असलेली भारत जोडो यात्रेचा आज सोमवारी श्रीनगरमध्ये समारोप होत आहे. अ

’ईडी’च्या आरोपपत्रातील ‘तो’ माजी मुख्यमंत्री कोण ?
अबब…! दोन महिन्यात पुल खचला
अपघात टाळण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग वाहतूक सुरक्षेसाठी उपाययोजना राबवाव्यात

श्रीनगर/वृत्तसंस्था ः तब्बल 145 दिवसांपासून देशातील विविध शहर, राज्यातून सुरू असलेली भारत जोडो यात्रेचा आज सोमवारी श्रीनगरमध्ये समारोप होत आहे. अनेक राज्यांचा प्रवास करत काँगे्रस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली भारता जोडो यात्रा पदयात्रा श्रीनगरमध्ये पोहचली असून रविवारी त्यांनी श्रीनगरमधील लाल चौकात तिरंगा फडकावला आहे. भाजपच्या धार्मिक विद्वेषाच्या राजकारणाविरोधात निघालेल्या भारत जोडो यात्रेने काँगे्रसला एक नवसंजीवनी देण्याचे काम केले.
1948 मध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनीही लाल चौकात तिरंगा ध्वज फडकावला होता. पंडित नेहरूंनंतर लाल चौकात तिरंगा फडकवणारे राहुल गांधी हे दुसरे काँग्रेस नेते ठरले आहेत. तिरंगा फडकवताना राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्यासह पक्षाचे अनेक ज्येष्ठ नेतेही उपस्थित होते. दरम्यान, राहुल आणि प्रियांकाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस-प्रशासनाने संपूर्ण परिसर सील केला होता.
भारत जोडो यात्रेने 12 राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांतील 1970 किलोमीटरचे अंतर कापत काश्मिर गाठले आहे. त्यानंतर आता आज सोमवारी भारत जोडो यात्रेचा श्रीनगरमध्ये समारोप होणार असून त्यासाठी विरोधी पक्षातले अनेक बडे नेते हजेरी लावणार असल्याची माहिती समोर आली आहे. जम्मू-काश्मीर भागामध्ये सुरक्षा यंत्रणेत त्रुटी असल्याचे सांगत राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा तात्पुरती स्थगित करण्यात आली होती. त्यानंतर काश्मिर खोर्‍यातून पदयात्रा करत राहुल गांधी रविवारी सकाळी श्रीनगरमध्ये दाखल झाले. भारत जोडो यात्रा लाल चौकात येताच कार्यकर्त्यांनी राहुल गांधी आणि काँग्रेसच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाजी सुरू केली. त्यानंतर राहुल गांधींनी लाल चौकात राष्ट्रीय ध्वजाचे ध्वजारोहण केले आहे. यावेळी काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. देशातील 12 राज्यांमध्ये राहुल गांधी यांनी पदयात्रा करत भाजपविरोधात रान पेटवले होते. यात त्यांनी बेरोजगारी, महागाई आणि बिघडलेल्या अर्थव्यवस्थेचा मुद्दा उपस्थित केला होता. द्वेष आणि कपटच्या राजकारणाला छेद देत लोकांना एकत्र येण्याचे आवाहनही राहुल गांधींनी केले होते. त्यानंतर आता 145 दिवसांनंतर भारत जोडो यात्रेचा श्रीनगरमध्ये समारोप होणार आहे. श्रीनगरमध्ये सोमवारी 30 जानेवारीला भारत जोडो यात्रेचा समारोप होणार आहे. त्यासाठी काँग्रेसने देशातील 12 विरोधी पक्षाच्या नेत्यांना निमंत्रण दिले आहे. काही राजकीय पक्षाच्या नेत्यांनी सुरक्षेच्या कारणास्तव कारणास्तव भारत जोडो यात्रेच्या समारोपात सहभागी होण्यास नकार दिला आहे. पदयात्रेच्या समारोपाच्या कार्यक्रमात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, द्रविड मुन्नेत्र कळघम (डीएमके), राष्ट्रीय जनता दल (आरजेडी), जनता दल (युनायटेड), सीपीआय (एम), केरळ काँग्रेस, नॅशनल कॉन्फरन्स, पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी)आणि झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम) हे पक्ष भारत जोडो यात्रेच्या समारोपाच्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

COMMENTS