सांगली प्रतिनिधी - नववर्षाच्या सुरुवातीला थर्टीफस्टच्या पार्श्वभूमीवर उत्पादन शुल्क विभागाने आवश्यक ती खबरदारी घेतलेली आहे.बेकायदा दारू विक्री

सांगली प्रतिनिधी – नववर्षाच्या सुरुवातीला थर्टीफस्टच्या पार्श्वभूमीवर उत्पादन शुल्क विभागाने आवश्यक ती खबरदारी घेतलेली आहे.बेकायदा दारू विक्री व वाहतूक थांबवण्यासाठी भरारी पथके आणि तपासणी नाके तयार केले आहेत. अशी माहिती अधीक्षक उत्पादन शुल्क विभाग संध्याराणी देशमुख यांनी दिली. बाहेरच्या राज्यातून बेकायदा दारू न येण्याची खबरदारी या विभागामार्फत घेण्यात येते. 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात बाहेरून मद्य येण्याची शक्यता असते.त्या पार्श्वभूमीवर उत्पादन शुल्क विभागाने जोरदार तयारी केली आहे. प्रत्येक तालुका पातळीवर भरारी पथके तयार करण्यात आली आहेत.त्याशिवाय सीमाभागात तपासणी नाके सुरू करण्यात आलेले आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. हे पथके हॉटेल, धाबे यांची तपासणी करणार आहेत.जत आणि मिरज तालुक्याच्या सीमाभागात तपासणी नाके सुरू करण्यात आलेले आहेत. रेल्वेतून येणाऱ्या दारूवर लक्ष ठेवण्यासाठी रेल्वेचीही तपासणी करण्यात येणार आहे.या काळामध्ये दारू पिण्यासाठी परवाने उपलब्ध करून देण्यात आले आहेत.दरम्यान , ग्रामपंचायत निवडणूक काळात आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी या विभागाने 121 जणांवर कारवाई करून 20 लाख 19 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
COMMENTS