Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भंडारदरा परिसर काजवा महोत्सवासाठी सज्ज

अकोले ः अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या परीसरातील कळसुबाई हरिश्‍चंद्रगड अभयारण्यात काजवा महोत्सवात यावर्षी पर्यटकांनी हाऊसफुल गर्दी होणार असू

इंजेक्शनच्या त्या व्हीडिओने उडवली खळबळ ; आनंदऋषीजी हॉस्पिटलने केला खुलासा
तुमचे आजचे राशीचक्र मंगळवार, २९ जून २०२१ l पहा LokNews24
तब्बल 42 तोळे सोने हस्तगत…सतरा घरफोड्या उघडकीस

अकोले ः अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या परीसरातील कळसुबाई हरिश्‍चंद्रगड अभयारण्यात काजवा महोत्सवात यावर्षी पर्यटकांनी हाऊसफुल गर्दी होणार असून या महोत्सवाची अगोदरच बुकींग सुरु झाल्या आहेत. काजव्यांसाठी भंडारदरा परिसर सजला आहे. हा काजव्यांचा चमत्कार बघण्यासाठी दरवर्षी 25 मे ते 15 जूनपर्यंत हजारो पर्यटक भंडारदर्‍यात दाखल होत असतात. याही वर्षी हा महोत्सव आयोजित केला आहे. अकोले तालुक्यातील पश्‍चिमेला सह्याद्रीच्या पर्वतरांगेत असणार्‍या कळसुबाई हरिश्‍चंद्रगड अभायारण्यात पावसाळ्याच्या अगोदर काजव्यांची चमचम सुरु होत असते. यावेळी ही काजव्यांची चमचम वेळेवर सुरु होण्याची शक्यता असुन अनेक पर्यटकांनी आपल्याला काजव्यांचा चमचम म्हणजे हा करिष्मा व्यवस्थित बघता यावा म्हणून टेंटधारक व हॉटेलमध्ये हिरडा बेहडा, सादडा यासारख्या झाडांवर अ‍ॅडव्हॉन्स बुकींग केली आहे. तर काजवा हा स्वयंप्रकाशित किटक आहे. काजवा हा रात्रीचे अंधारात कोट्यावधींच्या संख्येने एकाच वेळेस लयपद्ध पद्धतीने चमकत असतात. अनेक आयोजकांनी पर्यटकांना काजवा महोत्सवात आकर्षित करण्यासाठी सोशल मीडियावर प्रसिद्धी करतांना दिसून येत आहे.

काजवा महोत्सवासाठी होणारी गर्दी लक्षात घेता वनविभागाकडून जोरदार तयारी सुरु असून पर्यटकांना काजव्यांचा व्यवस्थित आनंद घेता यावा म्हणुन अभयारण्यातील असणार्‍या प्रत्येक गावातील सदस्यांची आढावा बैठकही आयोजित केली गेली असल्याचे समजते. तर भंडारदर्‍यातील हॉटेल आनंदवन, हॉटेल यश, हॉटेल अमृतेश्‍वर, हॉटेल पंचशिल, हॉटेल न्यु समाधान, महाराष्ट्र पर्यटन निवास यांनीही पर्यटकांना काजवा महोत्सवात आकर्षित करण्यासाठी विशेष सवलती दिल्या असून अनेक टेंटधारकही सवलतीच्या दरात काजवा बुकींग करत आहेत. कोरोनाचे सावट आता पूर्णपणे नाहीसे झाल्याने गत तीन ते चार वर्षांपासून काजवा महोत्सव जोमाने सुरु झाला असून यावर्षी भंडारदर्‍याचा काजवा महोत्सव हाऊसफुल होणार असल्याचे दिसून येत आहे.

COMMENTS