म्हसवड / वार्ताहर : माण तालुक्यातील कै. आबासाहेब पोळ शिक्षण प्रसारक मंडळाच्या भालवडी माध्यमिक शाळेने एनएमएमएस परीक्षेत घवघवीत यश मिळवले असून इय

म्हसवड / वार्ताहर : माण तालुक्यातील कै. आबासाहेब पोळ शिक्षण प्रसारक मंडळाच्या भालवडी माध्यमिक शाळेने एनएमएमएस परीक्षेत घवघवीत यश मिळवले असून इयत्ता आठवीच्या आयुष पाटोळे राज्याच्या गुणवत्ता यादीत चमकला आहे.
भालवडी हे गाव अतिशय दुर्गम भागात असून या ठिकाणी स्वर्गीय सदाशिवराव पोळ तात्यांनी माध्यमिक शाळा सुरु करून शिक्षणाची दारे खुली केली. याचं गावात जुनिअर कॉलेज सुरु करून मुलीच्या शिक्षणाची सोय केली. नुकत्याच निकाल लागलेल्या एनएमएमएस परीक्षेत या विद्यालयातील सहा विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. त्यामधील एक विद्यार्थी राज्याच्या गुणवत्ता यादीत चमकला तर चार विद्यार्थी सारथी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत.
यशस्वी विद्यार्थी व त्यांना मिळालेले गुण, आयुष अजित पाटोळे (103), हिरवे संस्कृती संतोष (85), काटे पृथ्वीराज पांडुरंग (80), निकम रुद्रराज सोपान(79), काळंगे निखिल जोतिराम (78), काटे प्रतिभा अमोल (77).
यशस्वी विद्यार्थ्यांना प्राचार्य गजानन पुकळे परीक्षा विभाग प्रमुख शिल्पा खासबागे, सिकंदर सय्यद, श्रीराम कुंभार आदी शिक्षकांनी मार्गदर्शन केले.
एनएमएमएस परीक्षेतील यशाबद्दल संस्थेचे विश्वस्त, मार्गदर्शक, संचालक, डॉ. संदिप पोळ, मनोज पोळ, सचिव रामचंद्र मेनकुदळे, प्राचार्य गजानन पुकळे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष काशिनाथ जाधव, गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण पिसे, भालवडी ग्रामस्थांनी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.
COMMENTS