भाजपविरोधी राजकीय आघाडीवर ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या व्यक्त होण्याचा अर्थ !

Homeताज्या बातम्यासंपादकीय

भाजपविरोधी राजकीय आघाडीवर ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या व्यक्त होण्याचा अर्थ !

देशात भारतीय जनता पक्षाच्या सत्ताकारणाची पाळेमुळे खोलवर रुजत असताना आणि भाजपेतर पक्षांची सत्ता असलेल्या राज्यांत वेगवेगळ्या कारणास्तव उगारलेला कारवाई

पत्नी घटस्फोट देत नव्हती म्हणून सासरवाडीतील चौघांना पेटवले .
टिटवी येथे बंजारा परंपरेतील तीज सण उत्साहात 
माझा मृत्यू झाल्यानंतर मला औरंगाबादच्या भूमीत दफन करा: ओवेसी

देशात भारतीय जनता पक्षाच्या सत्ताकारणाची पाळेमुळे खोलवर रुजत असताना आणि भाजपेतर पक्षांची सत्ता असलेल्या राज्यांत वेगवेगळ्या कारणास्तव उगारलेला कारवाईचा बडगा, या सगळ्या संदर्भातून आता भाजपा विरोधात देशात सक्षम राजकीय आघाडी निर्माण व्हावी, अशा चर्चा जोर पकडू लागल्या आहेत. या चर्चेचे सूतोवाच नुकतेच राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या आघाडीने दिल्लीत घेतलेल्या एका मेळाव्यात करण्यात आले. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी देशातील भाजपा विरोधातील राजकीय आघाडीचे नेतृत्व शरद पवार यांनी करावे, असा एक ठरावच मंजूर केला आहे. अर्थात यापूर्वी देखील अशा प्रकारच्या चर्चा करण्यात येत होत्या. परंतु,  २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी अवघी दोन वर्ष उरलेली असल्यामुळे  यावर आता कृतिशील पाऊल उचलणे भाग आहे आहे. मात्र यासंदर्भात कृतिशील आणि ममता बॅनर्जी यांनी घेतली आहे. मात्र, भाजप विरोधातील राजकीय आघाडीचे नेतृत्व ममता बॅनर्जी या स्वत:कडे खेचून घेण्याच्या प्रक्रियेत कृतिशील असल्याचे दिसत आहे. ममता बॅनर्जी यानी उचललेले हे कृतिशील पाऊल, लक्षात घेताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवकांनी राजकारणातील दबावतंत्र म्हणून शरद पवार यांच्या नावांची चर्चा राष्ट्रीय पातळीवर सुरू केली. मात्र त्याच वेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड. बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांनी भाजपा विरोधातील होणाऱ्या राजकीय आघाडीचे नेतृत्व ममता बॅनर्जी यांच्याकडे सोपविण्यात यावे, असे मत मांडले आहे. देशातील तुल्यबळ शक्तीचे राजकारण म्हणून वंचित बहुजन आघाडी राष्ट्रीय पातळीवर किती मजबूत आहे, हा फार वेगळा भाग असला तरी, ऍड. बाळासाहेब प्रकाश आंबेडकर यांनी मांडलेले हे मत केवळ चर्चा निर्माण करणारे मत म्हणून लक्षात घेणे, ही घोडचूक ठरेल. बाळासाहेब आंबेडकर यांचे अलिकडील राजकारण आणि ममता बॅनर्जी यांचा पश्चिम बंगाल विजय या दोन्ही बाबींकडे सध्या संघाच्या प्रभावातील राजकारण म्हणून पाहिले जात आहे. पश्चिम बंगालमधील कम्युनिस्टांचा खातमा, काँग्रेसचा शक्तीक्षय आणि भाजपचा सत्तेचा दावा करूनही झालेला पराभव या तिन्ही गोष्टी साध्य करण्यासाठी केवळ ममता बॅनर्जी या एकट्या कारणीभूत नसून, त्यांच्या मागे त्यांना आगामी काळात विरोधी राजकीय शक्ती म्हणून राष्ट्रीय त्या राजकारणात स्थिर करण्यासाठी संघाने आखलेल्या रणनीतीचा तो भाग आहे, असा आरोप राजकीय समीक्षक आणि राजकीय जाणकार यांच्या कडून होत आहे. ऍड. बाळासाहेब प्रकाश आंबेडकर यांनी ममता बॅनर्जी यांना भाजप विरोधातील राजकीय आघाडीचे नेतृत्व देण्याची केलेली शिफारस ही निव्वळ योगायोग नसून सध्याच्या संघ प्रभावातील राजकारणाच्या रणनितीचाच तो भाग आहे. सध्याचे देशातील एकूणच राजकारण आता संघाभोवती फिरू लागले आहे. भारतासारख्या महाकाय असलेल्या आणि विभिन्न सांस्कृतिक बांधा असणाऱ्या देशात एकछत्री सत्ता अंमल कोणत्याही पक्षाला आता राखता येणार नाही, हे उघड सत्य आहे. स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास असणारा काँग्रेस पक्ष हा एकमेव असा पक्ष आहे, ज्यास अरूणाचल प्रदेश ते केरळ पर्यंत मतदार निर्माण करता आला आहे. मात्र, भाजपा हा पक्ष मध्य आणि उत्तर भारतातच आतापर्यंत शक्ती निर्माण करू शकला असल्याने भारत पादाक्रांत करणे त्यांच्या आवाक्या बाहेर आहे, हे संघाने हेरले आहे. त्यामुळे, संघ आपला प्रभाव इतर पक्षांना राज्यस्तरीय उपयोगात देऊन एकंदरीत भारतभरात भाजपला पसरवण्याचे स्वप्न पाहतो आहे, जे केवळ कठीण नाही तर अशक्यही आहे !

COMMENTS