Homeताज्या बातम्यादेश

भजनलाल शर्मा होणार राजस्थानचे नवे मुख्यमंत्री

पहिल्यादांच आमदार झालेल्या उमेदवाराला संधी

जयपूर : मध्यप्रदेश, छत्तीसगडप्रमाणेच भाजपने राजस्थानमध्ये देखील धक्कातंत्राचा वापर करत मुख्यमंत्रीपदी नवा चेहरा दिला आहे. भजनलाल शर्मा हे राजस्था

अहमदनगर : साखरपुडा वा लग्नासाठी आता परवानगी गरजेची ; जिल्ह्यातील आठवडे बाजार केले बंद
झोपलेल्या प्रशासनाला जाग करण्यासाठी गाढव मोर्चा : अ‍ॅड. राजू भोसले
आजोबा स्व.सुमनभाई शाह यांचा सेवाभावी शैक्षणिक वारसा जपणार ः रोहित शाह

जयपूर : मध्यप्रदेश, छत्तीसगडप्रमाणेच भाजपने राजस्थानमध्ये देखील धक्कातंत्राचा वापर करत मुख्यमंत्रीपदी नवा चेहरा दिला आहे. भजनलाल शर्मा हे राजस्थानचे नवे मुख्यमंत्री होणार आहेत. दिया कुमारी आणि प्रेमचंद बैरवा यांची उपमुख्यमंत्रिपदी निवड करण्यात आली आहे.
भाजपच्या केंद्रीय निरीक्षकांच्या उपस्थितीत जयपूरमध्ये मंगळवारी विधिमंडळ पक्षाची बैठक झाली. केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह व सरचिटणीस विनोद तावडे, सरोज पांडे या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी भजनलाल शर्मा यांची निवड करण्यात आली. माजी मुख्यमंत्री व भाजपच्या ज्येष्ठ नेत्या वसुंधरा राजे यांनी भजनलाल यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. तो एकमताने मंजूर करण्यात आला. भजनलाल शर्मा हे सांगानेर विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आले आहेत. शर्मा हे ब्राह्मण समाजातील आहेत. ब्राह्मण समाजातील व्यक्तीला राज्याच्या प्रमुख पदी बसवण्याचा निर्णय आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे.

COMMENTS