माजलगाव । प्रतिनिधीयेथील स्कूल ऑफ स्कॉलर्स शाळेचा विद्यार्थी सुहान सोहेब शेख याने शैक्षणिक वर्षात उल्लेखनीय कामगिरी करत ‘बेस्ट स्टुडंट ऑफ द इयर’ ह

माजलगाव । प्रतिनिधी
येथील स्कूल ऑफ स्कॉलर्स शाळेचा विद्यार्थी सुहान सोहेब शेख याने शैक्षणिक वर्षात उल्लेखनीय कामगिरी करत ‘बेस्ट स्टुडंट ऑफ द इयर’ हा मानाचा पुरस्कार पटकावला आहे. शाळेचे संचालक ओमकार खुरपे यांच्या हस्ते सुहानला सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
सुहानची सातत्यपूर्ण अभ्यासाची मेहनत, शिस्तप्रिय वृत्ती, जिद्द आणि सर्वांगीण प्रगती लक्षात घेता शाळा व्यवस्थापनाने त्याची या पुरस्कारासाठी निवड केली. शैक्षणिक गुणवत्ता, उत्तम वर्तन तसेच विविध उपक्रमांमधील सक्रिय सहभाग या सर्व बाबींमध्ये सुहानने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्याच्या या यशाबद्दल शाळेतील शिक्षकवर्ग, पालकवर्ग तसेच मित्रपरिवारातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. सुहान हा राजू मोगरेकर यांचा मुलगा तसेच हसन मोगरेकर यांचा नातू आहे. त्याच्या या उज्ज्वल यशाबद्दल कुटुंबीय व नातेवाईकांनी त्याचे अभिनंदन केले आहे. भविष्यातही सुहानने अशीच उल्लेखनीय कामगिरी करत यशाची नवनवी शिखरे गाठावीत, अशा शुभेच्छा सर्व स्तरांतून व्यक्त करण्यात येत आहेत.

COMMENTS