Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कृषी जैवतंत्रज्ञान विद्यार्थ्यांसाठी उत्तम करीअर संधी ः डॉ.अमोल सावंत

लोणी ः बारावीनंतर पुढे काय करावं असा प्रश्‍न विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना नेहमीच पडत असतो तसेच अनेक पर्याय विद्यार्थीपुढे उपलब्ध आहेत मात्र,

आमदार गडाखांचा असाही साधेपणा
डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेत आत्मा मालिक राज्यात अव्वल
सिव्हील जळीतकांडाचा अहवाल तयार…हलगर्जीपणाचा ठपका?

लोणी ः बारावीनंतर पुढे काय करावं असा प्रश्‍न विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना नेहमीच पडत असतो तसेच अनेक पर्याय विद्यार्थीपुढे उपलब्ध आहेत मात्र, भविष्यात भरपूर संधी उपलब्ध असणारा पर्याय तरुणाई निवडतांना दिसते. बहुतांशी विद्यार्थ्यांचा कल अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षणाकडे जास्त असतो. मात्र असे काही करियरचे पर्याय आहेत जे विद्यार्थ्यांना मोठी संधी आणि नोकरी उपलब्ध करून देणारे आहेत. यात बायोटेक्नॉलॉजी म्हणजेच जैवतंत्रज्ञान हा करियरचा उत्तम पर्याय ठरू शकतो अशी माहीती कृषि जैवतंञज्ञान महाविद्यालयांचे प्रा. अमोल सावंत यांनी दिली. बारावीनतंर करिअर संधी बाबत माहिती देतांना डॉ. सावंत बोलत होते. यावेळी कृषि महाविद्यालयांचे संचालक डॉ. उत्तम कदम, प्राचार्य भाऊसाहेब घोरपडे उपस्थित होते.
 यावेळी डॉ. सावंत म्हणाले, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात बायोटेक्नॉलॉजी अर्थात जैवतंत्रज्ञान ही जीवशास्त्र विषयामध्ये तंत्रज्ञानाचा अंतर्भाव असलेली अलीकडच्या काळात निर्माण झालेली शाखा आहे. परंतु, अतिशय अल्पशा कालावधीमध्ये भारताबरोबरच संपूर्ण जगात त्याचा विस्तार वेगाने होऊन जैवतंत्रज्ञान या शाखेचा अनुप्रयोग अभ्यासक्रमामध्ये होत आहे जसे कि सागरी जैवतंत्रज्ञान, हरित जैवतंत्रज्ञान, कृषी जैवतंत्रज्ञान, वैद्यकीय जैवतंत्रज्ञान, श्‍वेत जैवतंत्रज्ञान आणि औद्योगिक जैवतंत्रज्ञान. हा सर्व अभ्यासक्रम भारतातील व भारताबाहेरीलविविध विद्यापीठे बी. टेक.,बी. एस्सी.,एम. टेक.,एम. एस्सी. व पीएचडीच्या स्वरुपात विद्यार्थ्यांना निवडण्याची संधी देत आहेत.मानवाच्या सुखांसाठी आणि सध्याच्या परिस्थितीतील आव्हानांचा  सामना करत अधिक सुरळीतपणे जगता यावे यासाठी बायोलॉजीमध्ये तंत्रज्ञानाने केलेला सकारात्मक हस्तक्षेप म्हणजे बायोटेक्नॉलॉजी. ’लाइफ सायन्सेस’मधील ही अत्यंत नवीन आणि आधुनिक शाखा मानली जाते. तसे असले, तरी फार पूर्वीपासून माणूस बायोटेक्नॉलॉजीचा वापर करत आहे. दुधाचे दही करण्याच्या प्रक्रियेपासून हा प्रवास सुरू झालेला आहे. आज विविध औषधे, लसनिर्मितीपासून जेनेटिक इंजिनिअरिंग, क्लोनिंगपर्यंत असंख्य सेवा-उत्पादनांमध्ये आणि शेती, आरोग्य, औषध निर्माण, अश्या विविध क्षेत्रामध्ये बायोटेक्नॉलॉजीचा प्रभाव पाहायला मिळतो. जीवशास्त्र विषयात रस असणार्‍या सर्वच विद्यार्थ्यांना जैवतंत्रज्ञाना सारख्या शाखेत प्रवेश घेऊन अल्प शुल्कात करियर च्या उत्तम संधी उपलब्ध आहेत, त्याच प्रकारे मेडीकल अभ्यासक्रमामध्ये ठराविक जागा आणि त्यांत लागणारा खर्च हा दिवसेंदिवस वाढत असल्याने सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना जैवतंत्रज्ञान हा चांगला पर्याय ठरतांना दिसून येत आहे. कृषी जैवतंत्रज्ञान पदवीधरांना राज्यस्तरीय व केंद्रीय संशोधन संस्थांमध्ये, विविध जैवतंत्रज्ञान शासकीय व खासगी कंपन्या, प्रशासकीय सेवा शेती पाणी व्यवस्थापन, अन्नप्रक्रिया, पणन, कृषी निगडीत उद्योगधंदे, दुग्धविकास व पशुसंवर्धन, कृषी व्यवसाय व्यवस्थापन, भारतीय कृषी संशोधन परिषद, कृषी विद्यापीठे, राष्ट्रीय व सहकारी बँका, विविध कृषी महामंडळे यामध्ये स्तरांवर नोकरीच्या संधी उपलब्ध आहे. कृषी किंवा कृषी जैवतंत्रज्ञान निगडीत स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी केंद्रशासनाद्वारे प्रोत्साहन दिले जाते.असल्याने सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना जैवतंत्रज्ञान हा चांगला पर्याय ठरतांना दिसून येत आहे. 

COMMENTS