Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

स्वाभीमानाने परीवर्तन घडवा : आ. सदाभाऊ खोत

इस्लामपूर / प्रतिनिधी : मतदार संघातील माणसे म्हणतात गेली अनेक वर्षांपासून घड्याळ सोडून दुसर्‍या चिन्हांचे बटन दाबल तर आमच्यावर दबाव येतोय. म्हण

पाटण नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदी सौ. मंगल कांबळे बिनविरोध
सांगली जिल्हा परिषदेच्या सीईओंच्या पीएची तडकाफडकी बदली
प्रवीण दरेकरांनी जास्त जीबीचा पेनड्राईव्ह घ्यावा : सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांचा टोला

इस्लामपूर / प्रतिनिधी : मतदार संघातील माणसे म्हणतात गेली अनेक वर्षांपासून घड्याळ सोडून दुसर्‍या चिन्हांचे बटन दाबल तर आमच्यावर दबाव येतोय. म्हणून आता आम्ही तुमच्या सर्वांच्या आवडीचे चिन्ह आणलंय. त्यामुळे आता कोणत्याही दबावाला बळी न पडता निशिकांतदादांना मोठ्या मताधिक्यांनी निवडून देऊन परिवर्तन घडवा, असे आवाहन आ. सदाभाऊ खोत यांनी केले.
बावची (ता. वाळवा) येथे इस्लामपूर विधानसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार निशिकांत भोसले-पाटील यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत ते बोलत होते.
आ. सदाभाऊ खोत म्हणाले, येथील विद्यमान आमदार प्रत्येक निवडणुकीत म्हणतात आम्हाला तुमचा विकास करायचा आहे, संधी द्या. मग तुम्ही 35 वर्षे काय केलं. तुमच्या नाकावर टिचून दोन वेळा आमदार झालो. मतदार संघातील पाणी योजना मी मंजूर करून आणल्या. पाणंद रस्ते निशिकांतदादांनी मंजूर करून आणले आणि नारळ यांनी फोडले. हे आमदार फक्त बॅनर बाजी व नारळ फोडण्यात पटाईत आहेत. त्यामुळे इस्लामपूर विधानसभा मतदार संघात परिवर्तन घडवून निशिकांतदादांना विधानसभेत पाठवा.
निशिकांत भोसले- पाटील म्हणाले, परवा विद्यमान आमदारांनी प्रचार शुभारंभ केला. त्यावेळी भाषणात त्यांनी बावचीच्या लोकांना बावचीची लोक वाळव्याला पाला काढण्यासाठी जात होती, असे म्हणून हिनवले. तुम्ही ज्यांना सत्तेत बसवलंय त्यांनी लाचार बनवलं आहे. त्यांना साधा 35 वर्षात तुमच्या गावावरून जाणारा पेठ-सांगली रस्ता करायला आला नाही आणि ते विकासाच्या बाता मारत आहेत. तुम्ही एकदा संधी द्या 35 वर्षातील प्रलंबीत सर्व प्रश्‍न मार्गी लावतो.

COMMENTS